औरंगाबाद - काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील एका तरुण-तरुणीने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे, तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी मुलीचा तिच्या पतीशी संपर्क तोडला. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबाचे समुपदेशन केल्याने तरुण-तरुणी एकत्र आले आहेत.
पत्नीशी संपर्क न झाल्याने मुलाने आज दुपारी पुंडलिक नगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तरुणीकडे विचारपूस केली असता, तिने तरुणावर प्रेम असल्याची कबुली दिली. यावेळी पुंडलिक नगर पोलिसांनी तरुणीच्या घरच्यांचे समुपदेशन केले. त्यात समाधान झाल्याने तरुण-तरुणीने एक दुसऱ्यांना पेढा भरवला.
हेही वाचा - परवाना कर : व्यापारी महासंघाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट