ETV Bharat / state

पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू - aurangabad

औरंगाबाद येथील बाळापूर शिवारातील देवळाई तांडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी चिकलठाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
author img

By

Published : Mar 31, 2021, 3:50 PM IST

औरंगाबाद - बाळापूर शिवारातील देवळाई तांडा येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी चिकलठाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - मनसुख हिरेनच्या हत्येचा खुलासा लवकरच; एनआयएची माहिती

घनश्याम संजयकुमार शर्मा (वय.३०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बीड बायपास येथील छत्रपती नगर सातारा परिसरात राहत होते. सोमवारी तीन वाजता घनश्यामकुमार शर्मा हे पत्नी मुलगी आणि नातेवाईकांना घेऊन बाळापूर शिवारातील देवळाई तांडा येथे आले.यावेळी परिसरात असलेल्या तलावात घनश्यामकुमार व त्यांचे साडू पोहण्यासाठी उतरले.मात्र घनशाम यांना पोहता येत नसल्याने ते बुडले.यावेळी त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाही.

हेही वाचा - एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? मनसेची इम्तियाज जलील यांच्यावर टीका

अग्निशामक दलाला पाचारण
ग्रामस्थांनी पोलिस व अग्निशामक दलाला माहिती दिली.माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घनश्यामकुमार यांची शोधाशोध सुरू केली.यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.घाटी रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी चिकलठाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणाचा पुढील तपास कॉन्स्टेबल दिपक सुरासे करत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.