ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कार-मोटारसायकलच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; तीन जखमी

अपघाताची माहिती मिळताच पो. नि. भगीरथ देशमुख यांनी स. पो. नि. सुदाम वारे, उपनिरीक्षक सचिन सानप व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसही तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी येणाऱ्या-जाणाऱ्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना पैठण शहरातील माऊली व अरिहंत रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्या श्रेयाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

aurangabad
कार-मोटारसायकल धडक
author img

By

Published : Jan 13, 2020, 10:46 AM IST

औरंगाबाद- पैठण येथील शेवगाव रोडवर भरधाव मारुती कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मोहटा देवीचे दर्शन करून पैठणकडे निघालेल्या मोटारसायकलवरील एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रात्री औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी रहाटगाव (ता. पैठण) येथील दिपक प्रल्हाद फासाटे (वय.२४) हे आपले नातेवाईक आशाबाई प्रल्हाद फासाटे (वय.४६), पूजा रमेश फासाटे (वय. १०) व श्रेया रामनाथ सातपुते (वय. ७ वर्ष रा. सालवडगाव ता. पैठण) असे चौघेजण मोहटा देवीच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी मोटारसायकलने गेले होते. दर्शन करून परत येताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची मोटारसायकल क्रं (एम.एच. २० ई.एन ०२९९) व पैठणकडून येणारी पांढऱ्या रंगाची सुझुकी सियाझ मारुती कार क्र.(ए.एच. १७, ४४८०) ही दोन्ही भरधाव वाहने खुले कारागृहासमोरच्या वळण रस्त्यावर एकमेकांवर अदळली. या घटनेत मोटारसायकलवरील चौघांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पो. नि. भगीरथ देशमुख यांनी स. पो. नि. सुदाम वारे, उपनिरीक्षक सचिन सानप व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसही तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी येणाऱ्या-जाणाऱ्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना पैठण शहरातील माऊली व अरिहंत रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्या श्रेयाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. अन्य जखमींना मोठा मार लागला असल्याने त्यांना रात्री उशिरा औरंगाबादला हलविण्यात आले आहे. तर, श्रेयाचा मृतदेह सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध ठाणे अंमलदार गोपाल पाटील यांनी भादंविच्या २७९, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, मृत श्रेया ही शिक्षणासाठी आपल्या आजीकडे रहाटगावी दोन वर्षांपासून राहत असल्याचे समजले आहे.

हही वाचा- कन्नड साखर कारखान्याच्या 850 कामगारांच्या थकीत पगाराचा मार्ग तब्बल १० वर्षांनी मोकळा

Intro:पैठण- शेवगाव रोडवर भरधाव मारोती कार व मोटारसायकलची वळण रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मोहटा देवीचे दर्शन करून पैठण कडे निघालेल्या मोटारसायकल वरील एका सात वर्षीच्या मुलीला आपला जीव दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना गमवावा लागला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रात्री औरंगाबादला हलविण्यात आले आहे.Body:आपघाताची अधिक माहिती आशी
की, रविवारी सायंकाळी
रहाटगाव ( ता. पैठण ) येथील दिपक प्रल्हाद फासाटे (वय 24 ) हे आपले नातेवाईक आशाबाई प्रल्हाद फासाटे( वय 46 ), पूजा रमेश फासाटे ( वय 10 वर्ष ) व श्रेया रामनाथ सातपुते(वय 7 वर्ष रा. सालवडगाव ता. पैठण)असे चौघेजण मोहटा देवीच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी मोटारसायकल वरून गेले होते. दर्शन करून परत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची मोटारसायकल ( एमएच 20 - ई एन - 0299) व पैठणकडून येणारी पांढऱ्या रंगाची सुझुकी सियाझ मारुती कार एमएच 17 - 4480 ही भरधाव वाहणे खुले कारागृहासमोरच्या वळण रस्त्यावर एकमेकांवर अदळली. मोटार सायकल वरील चौघांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. Conclusion:आपघाताची माहीती मिळताच पो. नि. भगीरथ देशमुख यांनी स. पो. नि. सुदाम वारे, उपनिरीक्षक सचिन सानप, साहेबराव गिराशे, रामकृष्ण सागडे, पो. ना. किशोर शिंदे, भिमलाल राठोड, कल्याण ढाकणे, विठ्ठल ऐडके, सोमनाथ भागिले, दिनेश चव्हाण, करतारसिंग सिंगल यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी येणाऱ्या - जाणाऱ्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना पैठण शहरातील माऊली व अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमी चिमुकल्या श्रेयावर मृत्यूने दवाखान्यात नेत असताना रस्त्यावरच झडप घातली. अन्य जखमींना मोठा मार लागला असल्याने राञी उशीरा औरंगाबादला हलविण्यात आले आहे तर श्रेयाचा मृतदेह सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे. या आपघात प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरूद्ध ठाणे अंमलदार गोपाल पाटील यांनी भादंवीच्या 279, 304 (अ) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. मयत चिमुकली श्रेया शिक्षणासाठी आपल्या आजीकडे रहाटगावी दोन वर्षांपासून राहत होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.