ETV Bharat / state

धक्कादायक...मराठवाड्यात 9 महिन्यात 656 शेतकऱ्यांच्या आत्महत्या - शेतकऱ्यांच्या आत्महत्या

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. मात्र, प्रत्यक्षात सरकार राबवत असलेल्या योजना, पाहणी दौरे याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

9 महिन्यात 656 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
author img

By

Published : Nov 4, 2019, 10:00 PM IST

औरंगाबाद - दुष्काळ असो की, अतिवृष्ठी दोन्ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यात 9 महिन्यात 656 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा - कॅन्सरग्रस्तांसाठी युवतीने केले आपले केस दान

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. मात्र, प्रत्यक्षात सरकार राबवत असलेल्या योजना, पाहणी दौरे याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - जुळ्या मुलींना आयसीयूत सोडून मातेचे पलायन

आत्महत्येसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना राबवायच्या सोडून, आत्महत्या झाल्यावर तुटपुंजी मदत दिली जाते. सततची नापिकी, दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी खचत जात आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होत आहे. पेरणीसाठी कर्ज, कधी दुबार पेरणीसाठी कर्ज, त्यातही नुकसान झालं तर विमा कंपन्या विविध निकष लावून करत असलेली हेळसांड यामुळे शेतकऱ्यांचा कोणावरही विश्वास राहिला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येची आकडेवारी -

  1. औरंगाबाद - 100
  2. जालना - 73
  3. परभणी - 58
  4. हिंगोली - 26
  5. नांदेड - 86
  6. बीड - 145
  7. लातूर - 72
  8. उस्मानाबाद - 96

Intro:(Use stock photo)
(ऑक्टोबर महिन्याची माहिती अद्याप अपडेट नाही ही माहिती सप्टेंबर महिना अखेर पर्यंत आहे)
दुष्काळ असो की अतिवृष्ठी दोनही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याच चित्र मराठवाड्यात पाहायला मिळालं. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी आत्महत्येचं पाऊल उचलत आहे. मराठवाड्यात नऊ महिन्यात 656 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Body:निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केली गेल्या. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. मात्र प्रत्यक्षात सरकार राबवत असलेल्या योजना पाहणी दौरे याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचं पाहायला मिळतं असल्याचं चित्र आहे. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचं समोर आलं आहे.Conclusion:आत्महत्येसारखे प्रकारच घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना राबवायच्या सोडून, आत्महत्या झाल्यावर तुटपुंजी मदत दिली जाते. सततची नापिकी, दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी खचत जातोय हे चित्र सध्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. त्यात शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पेरणी साठी कर्ज, कधी दुबार पेरणीसाठी कर्ज, त्यातही नुकसान झालं तर विमा कंपन्या विविध निकष लावून करत असलेली हेळसांड यामुळे शेतकऱ्यांचा कोणावरही विश्वास राहिला नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यामुळेच मराठवाड्यातील आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

सप्टेंबरपर्यंत जिल्हानिहाय आत्महत्या..

औरंगाबाद - 100
जालना - 73
परभणी - 58
हिंगोली - 26
नांदेड - 86
बीड - 145
लातूर - 72
उस्मानाबाद - 96
एकूण - 656
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.