औरंगाबाद : हीटर लावलेल्या पाण्यात पडून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात ( Girl dies after falling into heated water ) घडली. श्रेया शिंदे अस चिमुकलीचे नाव असून या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांकडे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गरम पाण्यात पडून गंभीर भाजली : वाळूजमधील साईनगरात भागात जेवण करून हात धुण्यासाठी गेलेली श्रेया राजेश शिंदे ही 4 वर्षांची मुलगी 23 नोव्हेंबरला हीटर सोडलेल्या गरम पाण्याच्या बादलीत पडून गंभीर भाजली ( girl suffered severe burns by shock ) . तिचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आजी, आजोबा, काका, आई, वडील आणि सात वर्षांचा भाऊ असे श्रेयाचे कुटुंब आहे. श्रेयाचे वडील राजेश दुपारी कंपनीतून घरी परतले. आंघोळीसाठी त्यांनी जिन्याजवळील नळाखाली बादली भरून इलेक्ट्रिक बोर्डवर गरम करण्यासाठी हीटर लावले ( road heater to heat water) होते.
गळ्याचा वरचा भाग भाजला : श्रेया व तिचा मोठा भाऊ साई जेवण करत होते. दोघेही हात धुण्यासाठी नळाजवळ गेले. मात्र, पाण्यावरून पाय घसरून श्रेया गरम पाण्याच्या बादलीत पडली. राजेश यांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विजेचा झटका बसूनही त्यांनी बटण बंद केले व श्रेयाला बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र, गळ्याचा वरचा भाग भाजल्याने श्रेयाची प्रकृती गंभीर झाली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.