औरंगाबादमध्ये 'बामू' विद्यापीठात बीसीएच्या पेपरमध्ये ३ प्रश्न चुकीचे - औरंगाबाद विद्यापीठ
गेल्या 10 ऑक्टोबरला बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशनच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पाचव्या सत्राचा व्यवस्थापन लेखाकंन (मॅनेजमेंट अकाऊंट)चा पेपर होता. एकूण 30 गुणांसाठी हा पेपर होता. यामध्ये एकूण ६ प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी तब्बल ३ प्रश्न चुकीचे विचारण्यात आले.
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. आताही अशाच एका प्रकारामुळे विद्यापीठ चर्चेत आले आहे. या कारभाराचा नाहक फटका बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशनच्या तृतीय वर्षाच्या (बीसीए) विद्यार्थ्यांना बसला. परीक्षेत प्रात्यक्षिक प्रश्न विचारण्याऐवजी लेखी प्रश्न करून अकलेचे तारे तोडले. त्यामुळे एकूण 30 गुणांसाठी असलेल्या पेपरमधील तब्बल 24 गुणांवर पाणी फिरले गेले.
हे वाचलं का? - पीएमसी घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँक कर्मचारी संघटनेने सरकारला केली 'ही' सूचना
गेल्या 10 ऑक्टोबरला बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशनच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पाचव्या सत्राचा व्यवस्थापन लेखाकंन (मॅनेजमेंट अकाऊंट)चा पेपर होता. एकूण 30 गुणांसाठी हा पेपर होता. यामध्ये एकूण ६ प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी तब्बल ३ प्रश्न चुकीचे विचारण्यात आले. पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 2, 3 व 4 मध्ये प्रात्यक्षिक प्रश्न विचारणे आवश्यक असताना विद्यापीठातील तज्ज्ञांनी लेखी प्रश्न विचारले. त्यामुळे परीक्षार्थी बुचकळ्यात पडले. हे तीनही प्रश्न 24 गुणांसाठी होते. कोषप्रवाह विश्लेषण, रोखप्रवाह व अनुवाद विश्लेषण या प्रकरणावर प्रात्यक्षिक प्रश्न विचारणे गरजेचे असताना लेखी प्रश्न विचारून विद्यापीठाने कहरच केला.
हे वाचलं का? - विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
विशेष म्हणजे याचा उल्लेख बीसीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. परीक्षार्थींनी प्रात्यक्षिकांचा अभ्यास केला अन् त्यांच्यावर लेखी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. बीसीए शाखा ही महाविद्यालयात विनाअनुदानीत शाखा असून प्रश्नपञिका तयार करण्यापूर्वी संबधित कोणत्याही प्राध्यापकांना स्थान अथवा कल्पना दिली जात नाही. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका नाहक विद्यार्थ्यांना बसून त्यांच्या तब्बल 24 गुणांवर पाणी फिरले गेले. वास्तविक पाहता विद्यापीठ नामांकीत असताना परीक्षा विभागाकडून एवढ्या मोठ्या घोडचुका होतात कशा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. ही झालेली चूक दुरुस्त करून विद्यापीठ परीक्षार्थींना गुण बहाल करील का? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत असला तरी परीक्षार्थी माञ विद्यापीठाच्या नावाने बोंबा ठोकत आहे.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल तीन प्रश्न चुकीचे प्रश्न विचारून परीक्षार्थींना बुचकळ्यात टाकले. त्यामुळे त्यांच्या 24 गुणांचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित तर होतोच. यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे वैजापूरमधील असल्याने परीक्षार्थींचा गेलेला वेळ व झालेला मानसिक ञास भरून निघेल का? याचे उत्तर विद्यापीठाकडे आहे का? हे तीनही प्रश्न चुकीचे विचारण्यात आल्याचे संबंधित विषयाच्या एका प्राध्यापकाने सांगितले.
विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 24 गुणांचे होते प्रश्न.
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहते. विद्यापीठातील भोंगळ व गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या कारभाराचा नाहक फटका बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लीकेशनच्या तृतीय वर्षाच्या ( बीसीए ) विद्यार्थ्यांना बसला. परीक्षेत प्रॅक्टिकल प्रश्न विचारण्याऐवजी थेराॅटिकल प्रश्न करून अकलेचे तारे तोडले. त्यामुळे एकूण 30 गुणांसाठी असलेल्या पेपरमधील तब्बल 24 गुणांवर पाणी फिरले गेले.
या आश्चर्यकारक प्रकाराची अधिक माहिती अशी की, 10 ऑक्टोबर रोजी बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लीकेशनच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पाचव्या सञाचा व्यवस्थापन लेखाकंन ( मॅनेजमेंट अकाऊंट ) पेपर होता. एकूण 30 गुणांसाठी हा पेपर होता. यामध्ये एकूण सहा प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी तब्बल तीन प्रश्न प्रश्नपञिकेतून चुकीचे विचारण्यात आले. पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 2,3 व 4 मध्ये प्रॅक्टिकल ( प्रात्यक्षिक ) प्रश्न विचारणे आवश्यक असताना विद्यापीठातील तज्ञांनी थेराॅटिकल ( लेखी ) प्रश्न विचारले. त्यामुळे परीक्षार्थी बुचकळ्यात पडले. हे तिन्हीही प्रश्न 24 गुणांसाठी होते. कोषप्रवाह विश्लेषण, रोखप्रवाह व अनुवाद विश्लेषण या प्रकरणावर प्रात्यक्षिक प्रश्न विचारणे गरजेचे असताना लेखी प्रश्न विचारून विद्यापीठाने कहरच केला. विशेष म्हणजे याचा उल्लेख बीसीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. परीक्षार्थींनी प्रात्यक्षिकांचा अभ्यास केला अन् त्यांना लेखी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.Body:बीसीए शाखा ही महाविद्यालयात विनाअनुदानीत शाखा असून प्रश्नपञिका तयार करण्यापूर्वी संबधित कोणत्याही प्राध्यापकांना स्थान अथवा कल्पना दिली जात नाही. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका नाहक विद्यार्थ्यांना बसून त्यांच्या तब्बल 24 गुणांवर पाणी फिरले गेले. वास्तविक पाहता विद्यापीठ नामांकित असताना परीक्षा विभागाकडून एवढ्या मोठ्या घोडचुका होतात कशा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. ही झालेली चूक दुरुस्त करून विद्यापीठ परीक्षार्थींना गुण बहाल करील का? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत असला तरी परीक्षार्थी माञ विद्यापीठाच्या नावाने बोंबा ठोकत आहे. Conclusion:दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल तीन प्रश्न चुकीचे प्रश्न विचारून परीक्षार्थींना बुचकळ्यात टाकले. त्यामुळे त्यांच्या 24 गुणांचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित तर होतोच.यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे वैजापूरमधील असल्याने परीक्षार्थींचा गेलेला वेळ व झालेला मानसिक ञास भरून निघेल का? याचे उत्तर विद्यापीठाकडे आहे का? हे तिन्हीही प्रश्न चुकीचे विचारण्यात आल्याचे दस्तूरखुद्द संबंधित विषयाच्या एका प्राध्यापकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.