औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील हतनूरमध्ये एका युवकाने शेतात कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास संबंधित घटना घडली असून अद्याप कारण अस्पष्ट आहे. अक्षय सुधाकर सोनवणे (वय-२५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो विवाहित होता.
हा प्रकार नजीकच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कुटूंबीयांना कळवले. तसेच उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालवले. अक्षयवर या ठिकाणी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घाटी रुग्णालय त्याचे शवविच्छेदन केले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.