ETV Bharat / state

बंदोबस्ताला गेला, कोरोना घेऊन आला; जवानाच्या संपर्कात आलेल्या १२ नातलगांची औरंगाबादेत तपासणी

हिरापूर येथील एक जवान राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. बंदोबस्त निमित्ताने त्याला मालेगाव येथे पाठविण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर, त्याच्या संपर्कात आलेल्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील १२ नातलगांना औरंगाबाद येथे तपासणीसाठी रविवारी पाठविण्यात आले.

हिरापुर येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या कन्नड तालुक्यातील बारा नातलगांना तपासणीसाठी औरंगाबाद येथे हलविले

author img

By

Published : May 4, 2020, 11:04 AM IST

औरंगाबाद : सुट्टीत घरी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानास कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील १२ नातलगांना औरंगाबाद येथे तपासणीसाठी रविवारी पाठविण्यात आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिरापूर येथील एक जवान राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. बंदोबस्त निमित्ताने त्याला मालेगावयेथे पाठविण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान सदर जवान हा देवगाव रंगारी येथे व देवगाव रंगारी जवळ असलेल्या एका वाडीवर त्यांच्या नातेवाईकांकडे दोन वेळेस येऊन गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यानंतर पोलीस, ग्रामपंचायत प्रशासनाने त्या नातेवाईकांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पुढील तपासणीसाठी औरंगाबाद येथील एमआयटी रुग्णालयात रेफर करण्याचे सांगितले.

दरम्यान त्यांची तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असे सांगण्यात आले. देवगाव रंगारी सारख्या ग्रामीण भागात किट कोठून उपलब्ध करायची असा प्रश्न येथील स्थानिक प्रशासनांना पडला. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागात आधीच भीतीचे वातावरण आहे, त्यात प्रशासनाच्या हतबलतेमुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. तब्बल चार तासांनी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी वरिष्ठांशी बोलुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. दरम्यान येथील त्या कुटुंबाच्या शेजारी असलेल्या कुटुंबाचीही येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.