ETV Bharat / state

Zilla Parishad Reservation : जिल्हा परिषद निवडणूक सोडत जाहीर, 60 पैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद ( Zilla Parishad in Amravati district ) सदस्य पदाची आरक्षण सोडत ( Zilla Parishad Reservation ) आज काढण्यात आली. यामध्ये एकूण 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित ( 33 seats reserved for women ) करण्यात आल्या.

Zilla Parishad Reservation
जिल्हा परिषद आरक्षण
author img

By

Published : Jul 28, 2022, 9:33 PM IST

अमरावती - जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण ( Zilla Parishad Reservation ) सोडत आज अमरावती जिल्ह्यात पार पडली. नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर ( District Election Officer Pavneet Kaur ) , उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख यांच्यासह संबंधित तालुक्याचे तहसीलदार विविध गावांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने सोडत प्रक्रिया झाली. सुरुवातीला गावांची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली. जय संदीप रहाटे तसेच ऋचाल मिलिंद गंथडे या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव जाहीर करण्यात आले.

हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, सुषमा अंधारेंनी घेतले शिवबंधन हाती

अशी निघाली सोडत - जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा चांदूरबाजार मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, अचलपूर ,धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर ,भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर अशा 14 तालुक्यातील 66 जागांसाठी सोडत काढण्यात आली . 66 जागांपैकी महिलांना 33 जागा ( 33 seats reserved for women ) प्राप्त झाल्या. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 12 पैकी सहा महिला, अनुसूचित जमाती 13 पैकी 7 महिला, मागास प्रवर्ग 7 पैकी चार महिला, सर्वसाधारण 34 पैकी 16 महिला अशा जागांची सोडत निघाली. निवडणूक शाखेचे अधिकारी तसेच महसूल सहाय्यक अनुपम उईके आदींनी सोडत प्रक्रिया राबविण्यात सहाय्य केले.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule : स्टंटबाजी करू नका, आता शिंदे-फडणवीसांचे सरकार; चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.