ETV Bharat / state

Harshvardhan Deshmukh : विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सव - हर्षवर्धन देशमुख

मागील दोन वर्षातील कोरोनाच्या काळात समाजात वावरणाऱ्या अनेक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात वावरत ( Mental stress in students ) आहेत. त्यांना मानसिक ताण तणावातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी ( Yuva Mahotsav to relieve mental stress in students ) केले.

author img

By

Published : Oct 12, 2022, 6:58 PM IST

Youth festival in amravati
युवा महोत्सव

अमरावती : मागील दोन वर्षातील कोरोनाच्या काळात समाजात वावरणाऱ्या अनेक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात वावरत ( Mental stress in students ) आहेत. त्यांना मानसिक ताण तणावातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी ( Yuva Mahotsav to relieve mental stress in students ) केले. ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

हर्षवर्धन देशमुख

युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन : राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणुन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी देशाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असतांनाच श्री शिवाजी महाविद्यालयाचे सुद्धा अमृत महोत्सवी वर्ष सुद्धा असल्याने हा योगोयोग ( Dr Punjabrao Deshmukh Medical College ) आहे. युवा वर्गाला आपल्यातील कला गुणांना सादर करण्याची संधी या युवा महोत्सवाच्या माध्यमातून आली आहे. युवा महोत्सवाचे आयोजन हे विभागीय स्तरावर करण्यासोबतच जिल्हा स्तरावर सुद्धा करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा असे मत यावेळी हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू : या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबु इंगोले, उच्च शिक्षण संचालक डॉ. केशव तुपे यांच्यासह मंचावर विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, डॉ. प्रफुल गवई, युवा महोत्सवाचे संयोजक प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. राजीव बोरकर आदी उपस्थित होते.

५ हजार विद्यार्थी सहभागी : यावर्षीच्या युवा महोत्सवामध्ये विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १७९ महाविद्यालयांसह जवळपास ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असुन यामध्ये २७ कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. युवा महोत्सव २०२१ चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ब्रजलाल बियाणी महाविद्यालयाचे संयोजक दिपक धोटे, डॉ. किरण सांगवे यांच्यासह श्री शिवाजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध गझलगायक दिव्यांग मुकेश गोरले हा मानसिंग शेखावत जयपुर येथील स्पर्धेत पाच वेळ विजयी झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

सादरीकरणासोबतच व्यावसायिकरण महत्वाचे : विद्यापीठ हे माणसं घडविण्यासह विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांना वाव देणे तसेच क्रिडा प्रकारात संधी देण्यासाठी युवा महोत्सवाच्या माध्यमातून सदैव प्रयत्नरत असते. आपल्यातील कलांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठासह प्रत्येक ठिकाणी दालनाची नितांत गरज असल्याचे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. त्यासोबतच कलेच्या सादरीकरणासोबत त्यांचे व्यावसायिकीकरण करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले.

शिक्षणासोबतच सुप्त गुणांना वाव : शिक्षणासोबत आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच आयुष्याला दिशा मिळावी यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे आपल्या कलेचे सादरीकरण जिद्दीने करा यश सहजतेने मिळविने सोपे असल्याचे मत आमदार सुलभा खोडके यांनी केले.

जिंकण्यासाठीच खेळावे : कलेचे सादरीकरण आपल्यातील गुणांना विकास करण्यासाठी करा त्यासाठीच युवा महोत्सवाची हि मोठी संधी आहे. यामधुनच चांगले कलावंत घडु शकतात त्यामुळे कुठलीही स्पर्धा हि खेळाडुने जिंकण्यासाठीच खेळायला हवी असा मोलाचा संदेश श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबु इंगोले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

कलेकडे मनोरंजनाचे साधन म्हणून बघू नका : आपल्या सभोवताली घडत असलेल्या घडामोडींना कला वाव देत असते. धर्मसत्ता, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सत्तेला आवाहन देण्याचं काम कलेच्या माध्यमातून देत आल्याने तिच्याकडे रंजनाच साधन म्हणुन बघु नका असे आवाहन उच्च शिक्षण विभाग अमरावतीचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी केले.

कलाप्रकारात नैपुण्य : कलाप्रकारात नैपुण्य असते त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेमधुन विविध अंगे समाजातील घटकांना दाखवावे तसेच चार दिवशीय युवा महोत्सवाची मेजवानी मोठ्या प्रमाणात घ्यावी असे आवाहन कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे अभिनंदनीय प्रास्ताविक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. राजेश मिरगे यांनी तर आभार डॉ. सुभाष गावंडे यांनी मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.