ETV Bharat / state

हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारून युवतीची आत्महत्या

अमरावती शहरातील नेक्ट लेवल मॉलच्या अबाउ हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारून युवतीने आत्महत्या केली. ही युवती पोटे कॉलेजची विद्यार्थिनी होती.

हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारून युवतीची आत्महत्या
author img

By

Published : Oct 5, 2019, 3:11 PM IST

अमरावती - शहरातील गर्ल्स स्कूल चौक स्थित नेक्स्ट लेवल मॉल येथील अँड अबाउ हॉटेलच्या गच्चीवरून युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही युवती पोटे कॉलेजची विद्यार्थिनी होती. रूपाली सुरेश मुंदाने असे मृत युवतीचे नाव आहे.

हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारून युवतीची आत्महत्या

सकाळी साडेदहाच्या सुमारास रूपाली नेक्स्ट लेवल मॉल मध्ये पाचव्या मजल्यावर गच्चीवर स्थित अप अँड अबाऊ हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती. तिने सोबत आणलेली पर्स टेबलवर ठेवली आणि बॉटल मधले पाणी पिल्यावर तीन गच्चीवरून उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. रूपाली खाली पडताच नेक्स्ट लेव्हल मॉलमधील जिम मधून बाहेर पडलेले पोलीस शिपाई अविनाश आत्राम यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके हेसुद्धा घटनास्थळी आले. पोलिसांनी रूपालीने टेबलवर ठेवलेल्या पर्सची झडती घेतली असता त्यातून एक सुसाईड नोट आणि तिचा मोबाईल फोन मिळाला. मृत युवती रूपाली सुरेश मुंदाने असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना गाडगेनगर पोलिस ठाण्यात यायला सांगितले. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले या फूटेजमध्ये रुपाली ही एकटीच हॉटेलमध्ये आल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान रूपालीच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने पोटे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या मनात बी ई आणि त्यानंतर एमबीएला अनुत्तीर्ण झाल्याचे शल्य वर्षभरापासून घोळत होते. तिने स्वतःला बरेच दिवसापासून लायब्ररीत गुंतून ठेवले होते. मात्र, आज तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असे पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Intro:अमरावती शहरातील गर्ल्स स्कूल चौक स्थित नेक्स्ट लेवल मोल येथील अँड अबाउ हॉटेलच्या गच्चीवरून युवतीने खाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही युवती येथील पोटे कॉलेजची विद्यार्थिनी होती.

Body:रूपाली सुरेश मुंदाने असे मृत युवतीचे नाव आहे. आज सकाळी साडेदहा वाजता रूपाली नेक्स्ट लेवल मॉल मध्ये पाचव्या मजल्यावर गच्चीवर स्थित स्थित अप अँड अबाऊ हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती तिने सोबत आणलेली पर्स टेबलवर ठेवून आणि बॉटल मधले पाणी पिल्यावर वरून खाली उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. रूपाली खाली पडताच नेक्स्ट लेव्हल मॉल येथील जिम मधून बाहेर पडलेले पोलीस शिपाई अविनाश आत्राम यांनी तिला उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके हेसुद्धा घटनास्थळी आले. पोलिसांनी रूपालीने टेबलवर ठेवलेला परत झडती घेतली असता त्यातून एक सुसाईड नोट मिळाली. तसेच तिचा मोबाईल फोनही मिळाला. मृत युवती ही रूपाली सुरेश मुंदाने असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना गाडगेनगर पोलिस स्टेशनला यायला सांगितले. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले या फूटेजमध्ये रुपाली ही एकटीच हॉटेलमध्ये आल्याचे स्पष्ट झाले .
दरम्यान रूपालीच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने पोटे महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून बी ई आणि त्यानंतर एमबीएला अनुत्तीर्ण झाल्याचे शल्य तिच्या मनात वर्षभरापासून घोळत होते. तिने स्वतःला बरेच दिवसापासून लायब्ररीत गुंतून ठेवले होते मात्र आज तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असे पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.