ETV Bharat / state

प्रियकराचा लग्नास नकार; २१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - लग्न

प्रेमप्रकरणातून मुलाने लग्नास नकार दिल्याने, २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती  जिल्ह्यातील परतवाडा येथे घडली. या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

परतवाडा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 4, 2019, 2:49 PM IST

Updated : Jun 4, 2019, 4:25 PM IST

अमरावती - प्रेमप्रकरणातून मुलाने लग्नास नकार दिल्याने, २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडली. या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रियकराचा लग्नास नकार; २१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी, की परतवाडा येथील २१ वर्षीय तरुणीचे, ऋषी मिश्रा या तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. या प्रकरणातून दोघांनी लग्न करण्यासाठी घरातून पळ काढला. नंतर काही दिवसांनी ऋषीने मुलीला परत तिच्या घरी आणून सोडले. तेव्हा मुलीने ऋषीकडे लग्नाचा तगादा लावला. याकारणाने ऋषीने तिला तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली.

तेव्हा निराश झालेल्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये ऋषी मिश्रा आणि त्याचे वडिल कबीर मिश्रा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Intro:प्रेमप्रकरणातून लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या,अमरावतीच्या परतवाडा मधील घटना

अँकर:-
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रेमप्रकरणातून मुलाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणीचे परतवाडा येथील ऋषी मिश्रा या तरुणाशी तिचे प्रेम होते याच प्रेमातून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेऊन दोघही पळून गेले मात्र काहीच दिवसात ऋषीने मुलीला तिच्या घरी परत आणून दिले,मुलीने लग्नाचा तगादा लावताच ऋषी ने बदनामीची धमकी दिली. निराश झालेल्या मुलीने राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.दरम्यान यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी परतवाडा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली आणि कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून मुलगा व बापा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ऋषी कबीर मिश्रा व कबीर मिश्रा अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहेत परतवाडा पोलीस ठाण्यातील हद्दीतील 21 वर्षीय तरूणीला प्रेम जाळ्यात फसवून सदर तरुनीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी ऋषीने दिला लग्नाची आमीष दिले त्यानंतर एक दिवस ऋषीने सदर तरुणीला पडवून नेले काही दिवस सोबत राहिल्यानंतर ऋषीने तरुणीला तिच्या घरी आणून सोडून दिले या काळात तरुणीने ऋषीकडे लग्नाची मागणी केली पण तू ऋषीने तिला नकार दिला. तरुणी लग्नाबाबत तगादा लावल्यानंतर ऋषीने लग्नास नकार दिला. तिला समाजात बदनामी करण्याची धमकी दिली त्यामुळे निराश झालेल्या तरुणीने 30 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी .आता मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून दोन आरोपी विरुद्ध परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून .आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jun 4, 2019, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.