ETV Bharat / state

जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन, मदतीचे आश्वासन - Yashomati thakar news amravati

जिल्ह्यात घडलेल्या या विविध दुर्घटनांत नुकसान झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली. या कुटुबांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही ठाकूर यांनी यावेळी दिले

Yashomati thakur visited to families of the victims

author img

By

Published : Oct 3, 2020, 11:34 PM IST

अमरावती - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, तसेच इतर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयाची भेट घेतली. दुर्देवाने या कुटुंबांवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, तर एक बहीण म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले.

भातकुली तालुक्यातील धामोरी येथील नावेद्दिन अयमोद्दीन नावाचा १९ वर्षीय युवक तलावात बुडाल्याची पालकमंत्र्यांनी माहिती मिळताच त्यांनी या गावाला तत्काळ भेट दिली व त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यावेळी दुर्घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी रेस्क्यू टीमलाही निर्देश दिले. ही घटना अत्यंत दुर्देवी असून, असे प्रकार घडू नयेत, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तर या तरुणाच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. तसेच भातकुली तालुक्यातील पांढरी खोलापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर सरोदेच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.

जीवनात विविध अडचणी येत असतात. या कुटुंबावर अत्यंत दु:खद प्रसंग आला आहे. मात्र, कुणीही हिंमत हारू नये. एक बहीण म्हणून मी या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहीन, शासनाकडूनही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सरोदे यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. त्यानंतर, सोनारखेडा येथील प्रशांत मानकर या आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवाच्या कुटुंबाला भेट देऊन ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले.

कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर मात करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. शेतकरी बांधवांनी हिंमत हारू नये. विविध अडचणी येत असल्या तरी त्यावर मात करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात घडलेल्या या विविध दुर्घटनांत नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही ठाकूर यांनी यावेळी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.