अमरावती : जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे होतो (skywalk completed at Chikhaldara) आहे. या स्कायवॉकचे 72 टक्के काम पूर्ण झाले असून नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने आक्षेप घेतल्यावर हे काम जुलै 2021 पासून रखडले आहे. चिखलदरा येथे होऊ घातलेला स्कायवॉक सध्यातरी अधांतरीच (72 percent of work of skywalk completed) आहे.
असा आहे स्कायवॉक प्रकल्प : चिखलदरा येथील हरिकेन आणि गोरघाट या दोन महत्त्वाच्या पॉईंट दरम्यान स्कायवॉक राहणार आहे. उंच पहाडावर असणाऱ्या ह्या दोन्ही पॉईंटच्या दरम्यान खोल खायीच्या वर काचेचा हा स्कायवॉक असणार आहे. या स्कायवॉकसाठी हरिकेन आणि गोरघाट या दोन्ही पॉईंटवर पाचशे मीटर उंच मनोरे उभारण्यात आले आहे. जगात स्विझर्लंड आणि चीनमध्ये अशा स्वरूपाचे स्कायवॉक आहेत. स्विझरलँड येथील स्कायवॉकची लांबी 397 मीटर तर चीन मधील स्कायवॉकची लांबी 307 मीटर आहे. चिखलदरा येथील स्कायवॉकची लांबी सर्वाधिक 407 मीटर राहणार असून हा स्कायवॉक जगातील सर्वात लांब स्कायवॉक म्हणून गणला जाणार (Work Of Skywalk) आहे.
34 कोटी रुपयांचा प्रकल्प रखडला : सिडकोद्वारे एकूण 34 कोटी 34 लक्ष 36 हजार 947 रुपयांच्या या प्रकल्पाला 8 फेब्रुवारी 2019 ला सुरुवात झाली होती. आणि हा प्रकल्प 9 फेब्रुवारी 2021 ला पूर्ण होणार होता. वन अधिनियम 1980 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सिडकोने सादर केलेल्या या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय वन मंत्रालयाने काही अटी आणि शर्तीसह मान्य करीत 19 जानेवारी 2019 ला या प्रकल्पाला परवानगी दिली होती. मात्र ज्या भागातून हा स्कायवॉक जाणार आहे. तो भाग संरक्षित व्याघ्र प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने या प्रकल्पास जुलै 2021 मध्ये परवानगी नाकारली. त्यामुळे गोरघाट आणि हरिकेन पॉईंट या दोन्ही ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्याचे काम बरेचसे रखडले आहे.
या कारणामुळे रखडला प्रकल्प : चिखलदरा येथे ज्या भागातून हा स्कायवाक जाणार आहे, तो परिसर व्याघ्र अधिवासाचा भाग आहे. त्यामुळे परिसरात घनदाट जंगल असून वन्य प्राण्यांचा अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षण होणे, आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत नॅशनल वाइल्डलाइफ बोर्डने या प्रकल्पाला परवानगी नाकारली. यामुळे आता या प्रकल्पाचे काम 72 टक्के पूर्ण होऊन रखडले (work of skywalk completed) आहे.
स्टेट वाइल्डलाइफ बोर्डने दिली परवानगी : चिखलदरा येथील स्कायवॉक होण्यासंदर्भात कुठलीही अडचण नाही, याबाबत स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डने परवानगी दिली आहे. या परवानगी संदर्भातील कागदपत्र व्याघ्र प्रकल्प संचालकांकडे सादर करण्यात आले असून आता नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने सकारात्मक निर्णय घेतला, तर अवघ्या महिन्याभरात स्कायवॉकचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दक्षता आवश्यक : चिखलदरा येथे होणाऱ्या स्कायवॉकमुळे संपूर्ण मेळघाटात वन्यजीव पर्यटनाला निश्चितच लाभ मिळेल. महाराष्ट्रभरातील पर्यटक या प्रकल्पामुळे मेळघाटात येतील. प्रकल्पाला शासनानेच मान्यता दिली, असल्यामुळे याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. केंद्र शासनाने घोषित केलेल्या चिखलदरा येथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, याबाबत सर्वांनीच दक्षता घेणे, हे अतिशय आवश्यक असल्याचे मानद वन्यजीव संरक्षक डॉ. जयंत वडतकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना (including world largest skywalk) म्हणाले.
असा आहे प्रकल्प परिसर : चिखलदरा येथे एका पहाडावर असणारा हरिकेन पॉईंट आणि दुसऱ्या पहाडावर असणाऱ्या गोरघाट या पॉईंट दरम्यान हा स्कायवॉक असणार आहे. या परिसरात निवासी सैनिकी शाळा आहे. अनेक खाजगी हॉटेल्स देखील या परिसरात आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्राम गृह देखील याच परिसरात आहे. ज्या भागातून स्कायवॉक जाणार आहे, त्या खोल दऱ्यांमध्ये दोन गावे देखील वसली आहेत. यामुळे या भागात मानवांचाच वावर मोठ्या प्रमाणात असून वन्य प्राण्यांना या प्रकल्पामुळे धोका नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.