ETV Bharat / state

खिचडी शिजवणाऱ्या महिलांना चांगला मोबदला मिळावा - बबिताताई ताडे

खिचडी शिजवणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी बबिताताई ताडे यांनी केली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील बबिताताई ताडे यांनी एक कोटी रुपये जिंकले. बबिताताई या एका विद्यालयात खिचडी शिजवण्याचे काम करतात.

बबिताताई ताडे
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:29 PM IST

अमरावती - अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी मधील बबिताताई ताडे यांनी एक कोटी रुपये जिंकले. बबिताताई या एका विद्यालयात खिचडी शिजवण्याचे काम करतात. एक कोटी रुपये जिंकले असले तरी मी यापुढेही माझ्या विद्यार्थ्यांना खिचडी बनवून खाऊ घालेन, कारण ती माझी जबाबदारीच आहे, असे मत बबिताताई ताडे यांनी व्यक्त केलं आहे.

खिचडी शिजवणाऱ्या महिलांना चांगला मोबदला मिळावा

सरकारने पोषण आहार योजना 2002 मध्ये सुरू केली. तेव्हा आम्हाला केवळ दोनशे रुपये मिळत होते. त्यानंतर मुलांची पटसंख्या वाढल्याने आम्हाला एक हजार मिळू लागले. सध्या खिचडी शिजवण्याचे पंधराशे रुपये मिळतात.

हेही वाचा - थकबाकी न भरल्याने "शिवशाही" बस भररस्त्यात जप्त; फायनान्स कंपनीची कारवाई

खिचडी शिजवण्यासाठी मिळणारा हा मोबदला खुपच कमी आहे. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो कारण इतरही कमावणारे सदस्य आहेत. मात्र, इतरही अनेक महिला आहेत. त्यांचे पंधराशे रुपयात भागत नाही. त्यामुळे सरकारने मानधनात वाढ करावी, अशी मागणी बबिताताई ताडे यांनी केली.

Intro:करोडपती बबिताताईने दोनशे रुपये महिन्यापासून खिचडी शिजवायला केली होती सुरवात.

महिलांना चांगले पैसे मिळावे ही इच्छा.
-----------------------------------------
अमरावती अँकर

अमिताभ बचन यांच्या लोकप्रिय अशा कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी मधील एका महाविद्यालयात खिचडी शिजविण्याच काम करणाऱ्या बबिताताई ताडे यांनी एक कोटी रुपये जिंकले. परंतु एक कोटी जिंकले असले तरी मी यापुढेही माझ्या विद्यार्थ्यांना खिचडी बनून खाऊ घालेल कारण ती माझी जबाबदारीच असल्याच मत बबिताताई ताडे यांनी व्यक्त केलं. मुंबई वरून परत आल्यानंतर त्या etv भारतशी बोलत होत्या.

यावेळी etv भारत ला प्रतिक्रिया देताना ताडे म्हणाल्या की शासनाने ही पोषण आहार योजना 2002 मध्ये सुरू केली. तेव्हा आम्हाला केवळ दोनशे रुपये मिळत होते.त्यानंतर मुलांची पटसंख्या वाढली नंतर आम्हाला एक हजार मिळत होते आता पंधराशे रुपये मिळतात.पण ते पैसे अगदी तोडके आहे.माझ्या कुटूंबाच भागेल पण इतर अनेक महिला आहे.की ज्याचं पंधराशे रुपयात भागत नाही.त्यामुळे सरकार ने मानधनात वाढ करावी अशी मागणीही त्यांनी केली.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.