ETV Bharat / state

धक्कादायक.! आठ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या

author img

By

Published : Apr 28, 2020, 8:48 AM IST

Updated : Apr 28, 2020, 12:19 PM IST

जन्मदात्या आईनेच आपल्या आठ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाची हत्या करुन या महिलेने स्वतःदेखील गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना तापी नदीच्या काठावर वसलेल्या दय्यत या मध्यप्रदेशातील गावात शनिवारी पहाटे घडली.

आठ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करत आईने केली आत्महत्या

अमरावती - जन्मदात्या आईनेच आपल्या आठ महिन्यांच्या बाळाची तोंडावर उशी दाबून हत्या केली आहे. यानंतर महिलेने स्वतःदेखील फाशी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या दय्यत या मध्यप्रदेशातील गावात शनिवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेने धारणी तालुक्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

दय्यत गावातील शांताबाई आपल्या आठ महिन्याच्या मुलीसोबत घरामध्ये झोपल्या होत्या. तर, शांतीचा पती अनिल मिश्रीलाल (वय 31) घराबाहेर झोपलेले होते. मात्र, पहाटेच्या वेळी शांताबाई आणि त्यांची मुलगी दोघीही मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार के.पी. धुर्वे, तहसीलदार गोलकर, राजेंद्र ठाकूर, एसडीओपी एस. आर. सेंगर, हंसकुमार यांनी तत्काळ घटनास्थळी जात चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय शांतीने मुलीची हत्या करुन स्वतःला फासावर लटकवत आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेचे नेमके कारण सध्या समोर आले नाही. पोलीस या प्रकरणाची सध्या चौकशी करत असून लवकर सत्य समोर येईल. दरम्यान, या घटनेमुळे मध्यप्रदेशच्या देडतलई तथा धारणी तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated : Apr 28, 2020, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.