ETV Bharat / state

मंगरूळ चव्हाळात अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण - Amravati latest news

अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळात अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांनी उपोषण सुरु केले आहे. तर अनेक वेळा निवेदने देऊनही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Amravati
अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:53 AM IST

अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याने मोठ्यांसह लहान मुलांनाही दारूचे व्यसन लागले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत. त्यामुळे या गावातील दारू विक्री बंद झाली पाहिजे, यासाठी महिलांनी प्रजासत्ताकदिनापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अवैध दारू विक्री बंदसाठी महिलांचे उपोषण

मंगरुळ चव्हाळा या गावातील लोकवस्ती 7 हजार आहे. या गावात अवैधरीत्या दारू विकली जात असल्यामुळे याबाबत येथील महिलांनी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन ही दिली आहेत. परंतु, याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.

गावात जवळपास 30 ते 40 ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री केली जाते. दारू बंदीच्या या आंदोलनात आता गावातील काही पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे. गावातील दारू विक्री तत्काळ बंद न झाल्यास भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याच्या इशारा नागरिकांनी केला आहे.

Intro:अमरावती :दारूबंदीसाठी भर उन्हात महिलांचे आमरण उपोषण.

अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा गावातील प्रकार.
------------------------------------------------------------
स्पेशल पॅकेज स्टोरी करावी

अमरावती अँकर
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावात मोठ्या प्रमाणावर ठीक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने मोठ्यांसह
लहान मुलांनाही दारूचे व्यसन लागले आहे.त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला गेले आहे. त्यामुळे या गावात होणारी अवैध दारू विक्री कायमचीच बंद झाली पाहिजे यासाठी येथील महिलांनी प्रजासत्ताकदिनी आमरण उपोषण सुरू केले आहे .पाहूया एक स्पेशल रिपोर्ट .

Vo-1
हे आहे अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा मधील पोलिस स्टेशन आणि याच पोलिस स्टेशन पासून वीस फुटाच्या अंतरावर सुरू असलेलं हे महिलांचे उपोषण बघा वरून मंडप नाही त्यामुळे दिवसभर लागणारी उन, रात्री लागणारी थँडी एवढे कमी म्हणून की काय त्यात सोमवारी आलेले पाणी आणि त्या पान्यात डोक्यावर छत्री घेऊन जिद्दीने आमरण उपोषण करणारी ही कल्पना बाई तांदूळकर मागील अनेक महिन्यापासून या कल्पनाबाईंनी दारूबंदीसाठी लढा उभारला 2 ऑक्टोंबर रोजी दारूबंदी साठी निवेदन दिलं पण पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही .त्यामुळे ही महिला प्रजासत्ता दिनी उपोषणाला बसली आहे.

बाईट-1-कल्पना तांदुळकर-उपोषणकर्ते महिला

Vo-2
सात हजार लोकवस्ती असलेलं मंगरुळ चव्हाळा हे गाव या गावात ठिकाणी अवैधरित्या दारू विकली जाते याबाबत येथील महिलांनी अनेकदा पोलिसांना मोठ्या अधिकाऱ्यांना निवेदन ही दिली परंतु दारूबंदी झाली नाही अवैधरित्या दारू विकत असल्यामुळे अनेक घरी वाद होतात तर अनेक मुलं या दारुमुळे पोरकी झाले.
त्यामुळे ही दारू बंद करा अशी मागणी येथील लहान मुलेही करू लागली आहे.

बाईट-2-वैशाली भोसले-विद्यार्थीनी

Vo-3
गावात जवळपास 30 ते 40 ठिकाणी अवैधरित्या दारू ही विक्री जाते.ज्या जन्मदात्या आईने मुलाला लहानाचे मोठे केले त्या माउलीला आणि जिने अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वनच दिले त्या पत्नीलाही तिचा नवरा रोजचं दारू पिऊन मारत असल्याची खंत महिला व्यक्त करतात.

बाईट-3-उषा बेलसरे-ग्रामस्थ महिला
बाईट-4-अनिता बेलसरे -ग्रामस्थ महिला

Vo-4
दारू बंदीच्या या आंदोलनात आता गावातील काही पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे.गावातील दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं.

बाईट-5-मनोज नेमाडे-ग्रामस्थ

Vo-5
एकीकडे महिलांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रासाठी नवीन नाही.परंतु दारू पिऊन या महिलांच्या मनावर होणारे मानसिक अत्याचार ही रोजची नित्याची बाब झाली आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत.तर खासदार नवनित राणा आहेत.आता या महिलांच्या मदतीला या महिला लोकप्रतिनिधी धावून येतील अशी आशा करूया .

स्वप्निल उमप
Etv भारत अमरावती
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.