ETV Bharat / state

अमरावती : ऑक्सिजन पातळी 45 वर तरीही महिलेने केली कोरोनावर मात

author img

By

Published : May 25, 2021, 3:38 PM IST

मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अठराशे लोकसंख्येच्या गावात मे महिन्याच्या सुरुवातीला एका लग्नामध्ये तब्बल 86 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच गावाच्या देवकाबाई तुकाराम गायन वय ५४ यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती एवढी खालावली होती की, त्यांची ऑक्सिजन पातळी 45 पर्यंत खाली आली होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

देवकाबाई तुकाराम गायन
देवकाबाई तुकाराम गायन

अमरावती - शहरात असलेला कोरोना आता गावागावात पोहोचला आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या मेळघाटामध्ये देखील दुसऱ्या लाटेत कोरोना पोहोचला आहे. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अठराशे लोकसंख्येच्या गावात मे महिन्याच्या सुरुवातीला एका लग्नामध्ये तब्बल 86 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच गावाच्या देवकाबाई तुकाराम गायन वय ५४ यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती एवढी खालावली होती की, त्यांची ऑक्सिजन पातळी 45 पर्यंत खाली आली होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या देवकाबाई आता कुटुंबाची काळजी घेत आहेत. घरचे कोणीही कोरोनाबधित होऊ नये, म्हणून त्यांनी आपली खाट घराच्या ओरांड्यातच टाकली असून, तिथेच त्या आयसोलेट झाल्या आहेत.

मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या देवगावात एक वर्ष कोरोनाचा शिरकाव नव्हता, पण २८ एप्रिलला एक लग्नसमारंभ पार पडला, या लग्न समारंभात नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडीपैकी सात जण हे आधीच कोरोनाबाधित होते. गावातील काही लोकांची देखील लग्नाला उपस्थिती होती. आणि येथूनच गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. गावातील तब्बल 86 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर गावाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या. गावात फवारणी आदी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता पुन्हा या गावात १६० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी पुन्हा 34 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी २४ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १० रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. गावात आतापर्यंत 250 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ऑक्सिजन पातळी 45 वर तरीही महिलेने केली कोरोनावर मात

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

मला खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोनाची लागण झाल्याने मी प्रार्थना मंदिरात उपचार घेतले, मात्र प्रकृती खालावल्याने मला उपचारासाठी परतवाडा येथे हलवण्यात आले. माझी ऑक्सिजन पातळी 45 पर्यंत खाली गेली होती. मात्र मी हरले नाही, प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य उपचाराच्या जोरावर मी कोरोनावर मात केली. आता शासनाच्या निर्देशानुसार मी घराच्या ओरांड्यातच होम आयसोलेट झाले आहे. अशी प्रतिक्रिया देवकाबाई गायन यांनी दिली.

सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. या भागात शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा व विविध अफवांमुळे येथील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरतात. मात्र देवकाबाई यांनी असे न करात, त्रास जाणवू लागल्यानंतर लगेच कोरोना चाचणी केली. चाचणी लवकर केल्याने वेळेत उपचार मिळू शकले आणि त्यांनी कोरोनावर मात देखील केली.

हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.