ETV Bharat / state

Basundi Tea : स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत दोन मित्रांनी थाटला 'बासुंदी चहा' चा व्यवसाय - Basundi Tea

अमरावतीच्या बालपणीच्या दोन जिवलग मित्रांनी एकत्र येत भागीदारीमध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या आठ महिन्यांतच महिन्याला थोडे थाडके नव्हे तर दीड लाख कमवायला ही ( earned one and a half lakh during competitive exams ) लागले. हे साध्य केले तिशी च्या आतील असलेल्या प्रज्वलित इंगळे आणि आकाश वाहणे या दोन तरुणांनी. 'बासुंदी चहा' या नावाने स्वतः चा ब्रँड तयार ( Basundi tea business of two friends ) केला. आणि हातोहात शहरात चार ठिकाणी फ्रेंचायझी सुद्धा ( Tea business in partnership ) दिली.

Basundi Tea
बासुंदी चहा
author img

By

Published : Sep 22, 2022, 5:37 PM IST

अमरावती - सगळीकडे बेरोजगारीचे भीषण वास्तव असतांना आपण किती दिवस घरात स्वस्थ बसायचं? बेरोजगारीच्या भस्मासुराने आपल्याला कवेत घ्यायच्या अगोदर आपणच त्यावर मात केली पाहिजे, असे म्हणत 'इच्छा असली तर मार्ग नक्कीच मिळतो, अशी खुणगाठ मनाशी बाळगून अमरावतीच्या बालपणीच्या दोन जिवलग मित्रांनी एकत्र येत भागीदारीमध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या आठ महिन्यांतच महिन्याला थोडे थाडके नव्हे तर दीड लाख कमवायला ही ( earned one and a half lakh during competitive exams ) लागले. हे साध्य केले तिशी च्या आतील असलेल्या प्रज्वलित इंगळे आणि आकाश वाहणे या दोन तरुणांनी. 'बासुंदी चहा' या नावाने स्वतः चा ब्रँड तयार ( Basundi tea business of two friends ) केला. आणि हातोहात शहरात चार ठिकाणी फ्रेंचायझी सुद्धा ( Tea business in partnership ) दिली.

बासुंदी चहा

दिवसाला विकतात ५०० कप चहा - याच वर्षी जानेवारीत बासुंदी चहा च्या व्यवसायाला सुरुवात( Prepared tea brand While studying ) केली. स्वतः च चहाचा मसाला तयार केला असून त्याचे प्रमाण आम्हीच ठरवल्याचे त्यांनी सांगितले. 10 रुपये प्रति कप याप्रमाणे आज रोजी दिवसाला 400 ते 500 कप एवढा चहा विकला जातो. आजूबाजूच्या सर्व शासकीय कार्यालयात चहा पुरवला जातो. कार्य प्रसंगाच्या ऑर्डर सुद्धा मिळतात.

अशी सुचली कल्पना - बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर सहा सात वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पण यश मात्र सातत्याने हुलकावणी देत होते. अशातच वय वाढत होते. दोन पैसे कमवण्यासाठी कुटुंबाकडून सातत्याने प्रेशर वाढत होते. नवीन काय करावे अशा विवंचनेत असतानाच बासुंदी चहाची कल्पना सुचल्याचे प्रज्वल इंगळे ने सांगितले. तर मार्केटिंग मध्ये एमबीए करणारा आकाश वाहणे यांनी सांगितले की, मला खाद्यान्न व्यवसायामध्येच काहीतरी करायचे होते. परंतु नेमके काय करावे हे सुचत नव्हते. शेवटी भांडवल हा प्रश्न होताच. अल्प भांडवलात सुरू होणाऱ्या चहा ची कल्पना सुचली आणि आवडली सुद्धा.

युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरावी - आकाश वाहने उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी आज बेरोजगार झाले आहेत. आज ना उद्या नोकरी लागेल या आशेने लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षाची तयारी करतात. परंतु खूप कमी विद्यार्थ्यांना यामध्ये यश प्राप्त होते. दिवसेंदिवस वय वाढल्याने कुटुंबाकडून सुद्धा 'काहीतरी कमवायला लागा' असे दबाव आल्यानंतर युवकांनी खचून न जाता स्वयंरोजगाराची कास धरावी,असा सल्ला आकाश ने तरुणांना दिला आहे.

सध्या आहे चहाची क्रेझ - चहाची वेळ नसते पण वेळेला चहा लागतो, सकाळचा चहा म्हणजे आनंद पर्वणी ,घोट घेत घेत त्याची चव अनुभवावी, बाहेर असावा रिमझिम हळवा पाऊस, जुन्या आठवणींची मनात गर्दी व्हावी , अशा किती गोष्टी चहा विषयी सांगता येतील. प्रेमाचा चहा, येवले अमृततुल्य,सायबा अमृततुल्य,काकांचा चहा असे कितीतरी ब्रँड चहा मध्ये आले आहेत. पण त्यांची फ्रेंचायझी घेणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने आपण स्वतःचा ब्रँड विकसित केला असल्याची माहिती आकाश ने ईटीव्ही शी बोलताना दिली.

ना भाडे ना प्रदूषणाचा धोका - शहरात दुकान भाड्याने घेणे म्हणजे साधं सोपं नव्हतं. भरमसाठ भाडे, पगडी, हे सगळे परवडण्यासारखे नव्हते. म्हणून ई- रिक्षावरच चहाचे दुकान टाकण्याचे ठरवले. त्यानुसार राजस्थानमधील एक कंपनीने ई-रिक्षावर चहाच्या संपूर्ण दुकानाचा सेटअप करून दिला. पाण्याची टाकी, गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी जागा, चहा तयार करण्यासाठी लागणारी जागा, असं सगळं परिपूर्ण सेटअपच करून घेतलं. ई- रिक्षा असल्याने पेट्रोल लागत नाही, त्यामुळे प्रदूषणाचा धोका नाही. थोडक्यात सांगायचं तर इको- फ्रेंडली टी स्टॉल आम्ही सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोर्टाला लागून अगदी जिल्हा परिषद समोर बासुंदी चहाचे दुकान सकाळी १०ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहतअसल्याची माहिती आकाश आणि प्रज्वलित यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.