ETV Bharat / state

Comrade Marathon Competition: दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील काँग्रेस मॅरेथॉन 2023 मध्ये सहभागी होऊन यशस्वी कामगिरी करणाऱ्या दीपमाला साळुंखे बद्रे, दिलीप पाटील आणि यवतमाळचे ललित कुमार वराडे या तिन्ही स्पर्धकांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अमरावती शहरातील शेकडो धावपटू अमरावती रेल्वे स्थानकावर हजर होते.

Comrade Marathon Competition
कॉम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचे स्वागत
author img

By

Published : Jun 14, 2023, 12:37 PM IST

कॉम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचे स्वागत

अमरावती : कोम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत बाजी मारणाऱ्या दीपमाला साळुंखे बद्रे, दिलीप पाटील आणि ललित कुमार वराडे यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर स्वागत झाले. त्यानंतर त्यांची रेल्वे स्थानकापासून जिल्हा स्टेडियमपर्यंत शहरातून खुल्या जीपमध्ये मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली. अमरावती शहरातील धावपटूंनी यावेळी जल्लोष केला. जिल्हा स्टेडियम येथे या तिन्ही स्पर्धाकांचा अमरावतीकरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

'अशी' आहे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा : कॉम्रेड मॅरेथॉन ही 90 किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्वायझुल्लू नताल प्रांतात दरवर्षी डरबन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात. ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. 90 किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिले जाते. या स्पर्धेत दीपमाला साळुंखे बद्रे यांनी 90 किलोमीटरचे अंतर अकरा तास दहा मिनिटांमध्ये गाठले, तर ललित कुमार वराडे यांनी दहा तास 42 मिनिट आणि दिलीप पाटील यांनी दहा तास 41 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली.

120 किलोमीटर धावण्याचा सराव : कॉम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेकरिता मी आठवड्याला 80 ते 120 किलोमीटर धावण्याचा सराव केला. माझी संपूर्ण तयारी करून घेण्याकरिता दिलीप पाटील यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच संतोष काकडे यांचे मार्गदर्शन आणि माझे पती प्रदीप बदरे यांची साथ लाभल्यामुळेच मी हे यश मिळविल्याची प्रतिक्रिया दीपमाला साळुंखे बद्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा :

  1. Tata Mumbai Marathon : भारतीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन गटात चावी यादव विजयी; विजयनानंतर म्हणाली, "25 किलोमीटरपर्यंत... "
  2. Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे काउंटडाऊन सुरू; 'या' तारखेला होणार स्पर्धा
  3. Marathon Under Fit India Campaign : मुंबई महापालिकेकडून फिट इंडिया योजनेअंतर्गत मॅरेथॉनचे आयोजन; 'या' महिन्यात होणार प्रोमो रन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.