अमरावती - कोरोनामुळे जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. तर तेच दुसरीकडे दुसरीकडे जिल्ह्यातील १३८ गावात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचे झळ सोसावी लागत आहे. चिखलदरा तालुक्यातील १६ गावांमध्ये तबल १७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यातही मुबलक पाणी मिळत नसल्याने भर उन्हात ४५ डिग्री तापमानात डोंगर दऱ्यातून वाट शोधत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात चिखलदरा सोबतच अचलपूर तालुक्यातील पथ्रोट तर चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रपूर या गावातदेखील टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
हेही वाचा - जुन्नर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत धुमधडाक्यात लग्न; वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
जिल्ह्यात दरवर्षी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईला एप्रिलमध्येच सुरुवात होते. यावर्षी जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी, चिखलदरा, या तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या कळा येथील महिलांना सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, अचलपूर, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, भातकुली आणि अमरावती अशा १३ तालुक्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी ५३ विंधन विहिरी तसेच ९० खासगी विहिरी अशा एकूण १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे.
जिल्ह्यातील १३८ गावांपैकी ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे, त्यातील १८ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा हा केला जातो. मात्र, लोखसंख्येच्या तुलनेत पाणी कमी येत असल्याने टँकर आला की महिलांची पाण्यासाठी झुंबड होतानाचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.