ETV Bharat / state

अमरावती : वर्धा नदीत बोट बुडण्या पूर्वीचा व्हिडिओ आला समोर - wardha river of amravati district

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज या गावातून वाहणार्‍या वर्धा नदीत मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोट उलटल्याने अकरा जण नदीत बुडाले. त्यापैकी केवळ तिघांचे मृतदेह सापडले असून उर्वरीत लोकांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. बोट उलण्याची घटना घडण्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.

v
v
author img

By

Published : Sep 15, 2021, 8:04 PM IST

Updated : Sep 15, 2021, 8:27 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या झुंज या गावातून वाहणार्‍या वर्धा नदीत मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोट उलटल्याने अकरा जण नदीत बुडाले. यापैकी तिघांचेच मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडण्यापूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

व्हिडिओ

बोटीत 13 जण झाले स्वार

वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी रवी मटरे या व्यक्तीच्या दशक्रियाविधी आटोपून त्यांचे नातेवाईक झुंज गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीत रक्षा विसर्जनासाठी आले होते. रक्षा विसर्जन केल्यानंतर त्यांचे नातेवाईक नारायण माटरे, किरण खंडारे, अश्विनी खंडारे, वृषाली वाघमारे, अतुल वाघमारे, निशा माटरे, आदिती खंडारे, मोहिनी खंडारे, पियुष माटरे, पुनम शिवणकर आणि दोन वर्षांची चिमुकली वंशिका शिवणकर हे सर्वजण नदीकाठीच्या बोटीतून नौका विहार करण्यासाठी बोटीत स्वार झाले. अकरा जणांसोबत नदी काठचे आणखी दोघे या बोटीत स्वार झाले. चार जणांची क्षमता असणाऱ्या बोटीत तेरा जण स्वार झाले होते. नदीला पूर असल्याने नदीत असणाऱ्या डोहात बोट हुलावकण्या घेऊ लागली. त्यावेळी नदी काठच्या त्या दोघांनी बोटीतून उडी मारली आणि पोहत बाहेर निघाले. मात्र, इतर अकरा जण नदीत बुडाले.

शोध कार्य सुरूच

बत्तीस तासांपेक्षा अधिक काळ उलटला असून मंगळवारी सापडलेल्या नारायण माटरे, किरण खंडारे आणि वंशिका शिवंकर या तिघांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले होते. बुधवारी (15 सप्टेंबर) राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) दिवसभर नदीत शोध मोहीम राबविली. मात्र, नदीत बेपत्ता झालेल्या आठ जणांचा शोध सायंकाळपर्यंत लागला नव्हता.

हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटली; तीन मृतदेह हाती लागले, 8 अद्यापही बेपत्ता

Last Updated : Sep 15, 2021, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.