अमरावती Car Accident in Amravati : भरधाव वेगात असलेली कार चक्क फुटपातवर चढली. फुटपाथवर चढल्यावर देखील कारचा वेग चालक नियंत्रणात आणू शकला नाही त्यामुळं ही कार थेट फुटपाथवरील व्यावसायिकांचे खोके उडवत समोर निघाली. या अपघातात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. फुटपाथवर टेलर व्यवसाय करणारी महिला तसेच या भागातून स्कुटीने जाणाऱ्या एक डॉक्टर महिला जखमी झाल्या आहेत. अमरावती शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. किशोर अजित शर्मा (52) राहणार विलासनगर असे अपघातात दगावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रजनी पुरी (42) राहणार देशमुख लॉन आणि डॉ.गायत्री बनकर या अपघातात जखमी झाल्या आहेत.
अशी घडली घटना : शेगाव नाका परिसरातून राहत गावच्या दिशेने सुनील जाजू हा व्यक्ती आपल्या कारणे भरधाव वेगात निघाले असताना, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी रुग्णालयातून घरी जात असणाऱ्या डॉ. गायत्री बनकर यांच्या स्कुटीला कारणे जोरदार धडक दिली. डॉ.बनकर या स्कुटीसह रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पडल्या. यानंतर कार थेट फुटपातवर चढली. फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्या किशोर शर्मा यांच्या डोक्यावरून कारचे चाक गेले. यानंतर ही कार फुटपाथवर असणाऱ्या खोक्यावर जाऊन धडकली.
महिला झाली गंभीर जखमी : खोक्यात टेलरिंग काम करणाऱ्या रश्मी पुरी या सुद्धा अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे शेगाव नका परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांनी किशोर शर्मा आणि रजनीपुरी यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी किशोर शर्मा यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : शेगाव नाका परिसरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गाडगे नगर पोलिसांनी (Gadge Nagar Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कारचालक सुनील जाजू याला अटक केली आहे.
हेही वाचा -