अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये अज्ञात व्यक्तीने भाजप नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसड यांच्या अभिनंदनाचे बॅनर शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान फाडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव करीत भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन आणि दिवाळी शुभेच्छांचे ९ ते १० बॅनर लावले होते. संबंधित बॅनर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी फाडले. शनिवारी ही बाबा उघडकीस येताच कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.