अमरावती - इतिहासातील ज्या महान कर्तृत्ववान महिलांमुळे आजच्या स्त्रीला मानाचे स्थान मिळाले. त्यांचे कर्तृत्व आजच्या या आनंदाच्या उत्सवात विसरून न जाता. दिवाळीचा पहिला दिवा 'ती'च्या समोर ठेवून 'विचारांच्या दीपोत्सवा'चा शुभारंभ आज अमरावतीत झाला.
सावित्री शक्तीपीठ पुणे व आम्ही सावित्रीच्या लेकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. या अनोख्या दिवाळीची सुरुवात अमरावती, यवतमाळ मधील महिलांनी केली आहे.
दीपावली आनंदाचा, उत्साहाचा अनोखा सण. आज ज्यांच्यामुळे आपल्याला मानसन्मानाचे स्थान मिळाले. त्यांना विसरून कसे चालणार. राज्यातील विविध भागात सावित्रीच्या लेकींनी दिवाळीची पहिली पणती त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तींना दिली. स्वतः च्या घरी एकटीचा एकच दिवा लागेल. पण एकत्रित आलो तर असंख्य दिवे लागतील. व विचार प्रवाह अधिक तेजोमय होईल. या हेतूने स्थानिक रेखा कॉलनी येथील श्री ढाकुलकर यांच्या निवासस्थानी अनेक महिला एकत्रित आल्या. त्यांनी माँ जिजाऊ, सवित्रीमाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन पहिला दिवा प्रज्वलित केला.
सोशल डिस्टनसिंगचे पालन-
यावेळी उपस्थित महिलांनी पुस्तक व दिव्यांनी उपस्थितांचे स्वागत करण्यात केले. यासोबतच अर्जुन नगर येथे नगरसेविका वंदना मडघे, यवतमाळ येथील चांदूरे नगर ज्योत्स्ना अंबलकर यांच्याकडे सुद्धा विविध महिलांनी एकत्रित येत प्रतिमांसमोर दीप प्रज्वलित केले. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्यात आले. यावेळी सुषमा बगाडे, प्राजक्ता मेहरे, लता चिंचोलकर, रेखा अकोलकर , छाया कथिलकर, संगीता ढोक, कांताताई वानखडे, प्रियंका चींचोळकर, दीपाली वानखडे, योगिता खवले, शीतल वाट, शोभा खटाळे, मयुरी बगाडे, रुपाली वानखडे, राखी बगाडे, श्यामल मडघे आदींची उपस्थिती होती.
विचारांचा दीपोत्सव साजरा करूया-
ज्यांच्या विचारांमुळे व कार्यामुळे आम्हा स्त्रियांना शिक्षणाचा, माणूस म्हणून जगण्याचा व सारे सण, उत्सव साजरे करण्याचा अधिकार मिळाला. त्यांना आम्ही पहिला दिवा लावून विचारांचा दीपोत्सव साजरा केला. व यापुढे सुद्धा ही परंपरा कायम राखणार असल्याचे अमरावती मनपा विधी समिती उपसभापती वंदना मडघे, वैशाली ढाकुलकर यांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबईत काल ८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १९ रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा- घरात बसून नियमांचे पालन करत दणक्यात दिवाळी साजरी करा; महापौरांचे मुंबईकरांना आवाहन