ETV Bharat / state

Chikhaldara Skywalk : भारतातील पहिला स्कायवॉक अमरावतीच्या चिखलदऱ्यात; बांधकामाला केंद्राची परवानगी मिळाल्याने पर्यटकांमध्ये आनंद

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ), राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kade ), खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray Chikhaldara Skywalk ) यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. ( Chikhaldara Skywalk ) त्यामुळे विदर्भातील पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chikhaldara Skywalk
स्कायवॉक
author img

By

Published : Jan 29, 2022, 3:14 PM IST

अमरावती - विदर्भाचे काश्मिर म्हणून ओळख असलेले अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळ चिखलदरा ( Vidarbha's Kashmir Chikhaldara ) येथे जगातील चौथ्या क्रमांकाचा तर भारतातील पहिल्या क्रमांकाचा स्कायवॉकची उभारणी होत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या वनविभागाने या स्कायवॉकच्या बांधकामाला ( Skywalk Construction Chikhldara ) स्थगिती दिली होती. या परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे केंद्र सरकारच्या वन विभागाने म्हटले होते.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ), राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kade ), खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray Chikhaldara Skywalk ) यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. ( Chikhaldara Skywalk ) त्यामुळे विदर्भातील पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्यटकांची संख्या आणखी वाढणार कारण...

चिखलदऱ्यातील गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट पर्यंत स्कायवॉक 407 मीटरचा हा प्रकल्प आहे. याचे काम जलदगतीनेही आता सुरू होणार आहे. भारतातील पहिला आणि जगातील चौथा हा गगनभरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येईल. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांच्या एक नवे आकर्षण निर्माण होईल. या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सध्या सिडकोच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. जगात स्विझर्लंड आणि चायना या ठिकाणी स्वित्झर्लंडचा या ठिकाणी स्कायवॉक आहे.

हेही वाचा - Covid Test Compulsory In Chikhaldara : चिखलदऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी करावी लागते कोरोना चाचणी.. शहरात १० कोरोना रुग्ण

चिखलदऱ्यातील लोकांना मिळणार रोजगार -

चिखलदरा हे राज्यभरातील एक महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्राला लागून मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे दरवर्षी पर्यटकांची येणारी संख्या चिखलदरामध्येही मोठी असते. दरम्यान, जेव्हा हा स्कायवॉक पर्यटकांसाठी उपलब्ध होईल, तेव्हा देशभरातील आणि विदेशातील पर्यटकदेखील वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच मेळघाटातील आदिवासी बांधवांना देखील रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होईल. याप्रकारे येथील अर्थकारणाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

चिखलदऱ्यात शुकशुकाट सध्या शुकशुकाट -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चिखलदरा पर्यटन केंद्रावर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या चिखलदऱ्यात पर्यटक यांचा शुकशुकाट आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू करण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे येथील जंगल सफारी ही बंदच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.