ETV Bharat / state

Uddhav Thackeray Amravati Visit: उद्धव ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर, राणांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त - उद्धव ठाकरे यांचा अमरावती दौरा

उद्धव ठाकरे यांचा दौरा त्यांच्या पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ते सध्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावती दौऱ्यावर आहेत.

Uddhav Thackeray Amravati Visit
उद्धव ठाकरे यांचा अमरावती दौरा
author img

By

Published : Jul 10, 2023, 8:24 AM IST

Updated : Jul 10, 2023, 10:16 AM IST

उद्धव ठाकरे आज अमरावतीत

अमरावती : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रात्री अमरावतीत पोहोचले आहेत. आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हनुमान चालीसा पठण करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रात्री उशिरापर्यंत राणा समर्थकांचा धिंगाणा : उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले पोस्टर फाडले. उद्धव ठाकरे हे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर राणा समर्थकांनी फाडले. यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी 11 वाजता शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावत असताना कॅम्प परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करीत हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देण्यासंदर्भात लावलेले पोस्टर आढळून आले. यामुळे संतप्त शिवसैनिकांना राणा समर्थकांनी लावलेले सर्व पोस्टर फाडून फेकल्यामुळे राणा समर्थकांनी शिवसैनिकांविरोधात शहरातील राजकमल चौक कॅम्प परिसर, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पोस्टर फाडून धिंगाणा घातला.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आज राणा समर्थक शहरात धिंगाणा घालू शकतात, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे हे रात्री शासकीय विश्राम भवन येथे मुक्कामाला होते. या ठिकाणी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी आणि तपासणी करूनच त्यांना पोलीस आत सोडत होते. गर्ल्स हायस्कूल चौक येथे राणादाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. या ठिकाणी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर : राणा दाम्पत्याने गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालीसाचे पठण करून दाखवावे, त्यांना त्यांच्या पायावर परत जाऊ दिले जाणार नाही असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याला प्रत्यूत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले आहेत. जयस्तंभ चौकातील उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने अमरावतीत वातावरण पेटलेले आहे. राणा समर्थक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पोलिसांच्या समोर विश्राम भवनावरील उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडले आहेत.

राणा दांम्पत्याचे बॅनर : पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडण्याचादेखील प्रयत्न केला. परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. याच विश्राम भवनात उद्धव ठाकरे हे मुक्कामाला असणार आहेत. तर महापालिकेनेही वातावरण बिघडू नये म्हणून राणा दांम्पत्याचे काही बॅनर काढून टाकले आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. अतिक्रमण करून बॅनर लावले असल्यामुळे महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे.

हेही वाचा :

  1. Uddhav Thackeray On CAA : एक देश, एक कायदा' मान्य मात्र, एक देश एक पक्ष' मान्य नाही - उद्धव ठाकरे
  2. Thackeray Vs Rana : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण, उबाठा आणि राणा समर्थकांनी एकमेकांचे पोस्टर फाडले
  3. Ravi Rana Targets Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणजे पावसाळी . . , विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आमदाराची ठाकरेंवर टीका

Last Updated : Jul 10, 2023, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.