ETV Bharat / state

Car accident : शिकवणी वर्गाला दांडी मारून फिरायला गेलेले युवक युवती कार अपघातात ठार - कार अपघात

शिकवणी वर्गासाठी घराबाहेर पडलेले युवक आणि युवती हे दोघेही सकाळी शहरातील कोंडेश्वर जंगल परिसरात कारने फिरायला गेले असताना अमरावती नागपूर महामार्गावर त्यांच्या कारने ट्रकला ओव्हरटेक करताना थेट ट्रकलाच धडक दिली. या गंभीर अपघातात ते दोघेही जागीच ठार झाले. (Car accident)

Car accident
शिकवणी वर्गाला दांडी मारून फिरायला गेलेले युवक युवती कार अपघातात ठार
author img

By

Published : Dec 19, 2022, 4:42 PM IST

अमरावती : दोघेही इयत्ता बारावीचे विद्यार्थी होते. नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता ते राजापेठ परिसरात शिकवणी वर्गासाठी जात होते. आज या दोघांनीही शिकवणी वर्गाला दांडी मारून थेट चार चाकी वाहनाने कोंडेश्वर परिसरात जात असताना अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे लगत सुसाट वेगात असणाऱ्या त्यांच्या कारने समोर असणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकलाच धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, आदित्य आणि गौरी घटनास्थळीच दगावले. (Car accident)

दोघांच्याही कुटुंबात झाली हाणामारी : दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दोघांचे कुटुंब हादरले. दोन्ही कुटुंब जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले असताना गौरीच्या कुटुंबीयांनी युवकाच्या कुटुंबावर हल्ला चढवला. ह्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्यावर युवकाचे कुटुंब थेट शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धडकले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात दोघांच्याही मृतदेहाचे विच्छेदन सुरू असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.