अमरावती - सर्पदंश झालेल्या आपल्या आईच्या भेटीला नागपूरहून गावी आलेल्या मुलाचा व त्याच्या मित्राचा नदीत बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक या गावात घडली. गंगाधर लक्षण गजबे, असे त्या मुलाचे नाव असून त्याच्या मित्राचे अद्याप समजू शकले नाही.
दोन दिवसांपूर्वी आईला सर्पदंश झाल्याने गंगाधर गजबे हा आपल्या आईला भेटण्यासाठी नागपूरहून आपल्या मूळ गावी शेंदोळा बुजरुक येथे आला होता. यावेळी त्याच्यासहा नागपूर येथील एक मित्रही आला होता. आज हे दोघेही दुपारच्या सुमारास गावानजीक असलेल्या सूर्यगंगा नदीत पोहायला गेले होते.पण, या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने व नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोन्ही मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची महिती मिळताच शोध व बचाव पथक दाखल होऊन त्यांनी दोन्ही मृतदेह हे पाण्याच्या बाहेर काढले आहे. दोन्ही जिवलग मित्राच्या मृत्यूमूळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अमरावतीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल; माजी मंत्री अनिल बोंडेचा गंभीर आरोप