ETV Bharat / state

तापमानवाढीचा केळी बागांना फटका, दोनशे हेक्टर केळी पिकाचे नुकसान - swapnil umap

वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. याचा फटका चांदुर बाजार तालुक्यातील केळी पिकांना बसला आहे.

पाण्याअभावी नुकसान झालेली केळीची बाग
author img

By

Published : May 15, 2019, 8:25 AM IST

अमरावती - वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. याचा फटका चांदुर बाजार तालुक्यातील केळी पिकांना बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे या परिसरातील केळीची झाडे अर्ध्यावरच उन्मळून पडत आहेत. याचा आर्थिक फटका या तालुक्यातील केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना बसणार आहे.

पाण्याअभावी नुकसान झालेली केळीची बाग

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. मात्र, गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी या भागातील विहिरी जवळपास आटल्या असून, कित्येक बोअरवेल निकामी झाल्या आहे, अशा परिस्थितीत पुरेशा पाण्याअभावी आपल्या केळीच्या बागा कशा वाचवाव्या हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असतानाच, तीव्र उष्णतेमूळे केळी उन्हाने करपत असून झाडांना पाणी न मिळाल्याने परिपक्व झालेले केळीच्या घडांसह झाडे आपोआप उन्मळून खाली पडत आहे.

या परिसरातील शेतकरी दरवर्षी आर्थिक फायदा होईल म्हणून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पिकांची लागवड करतो. परंतु, अशी बिकट स्तिथी निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडतो, शासनाने यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील केळी उत्पादकांनी केली आहे.
आता वाढलेल्या तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार काय दिलासा देते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Intro:अती उष्णतापमाना मुळे केळी बागांना फटका
दोनशे हेकटर केळी पिकांचे नुकसान

अमरावती अँकर
यावर्षी वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली असून याचा दुष्परिणाम अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील केळी पिकावर झाला आहे. वाढत्या उष्णते मुळे या परिसरातील केळी जागच्याजागी अर्ध्यावर उन्मळून पडत आहे. याचा आर्थिक फटका या तालुक्यातील केळी उत्पादकांना सोसावा लागत आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात केली उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास दोनशे हेक्टर मध्ये केळी ची लागवड केली आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने पाणी जमिनीत मुरलेले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली, परिणामी या भागातील विहिरी जवळपास आटल्या असून,कित्येक बोअरवेल निकामी झाल्या आहे. अशा परिस्थितीत पुरेशा पाण्या अभावी आपल्या केळीच्या बागा कशा वाचवाव्या हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असतानाच,तीव्र उष्णते मूळे केळी उन्हाने करपत असून झाडांना पाणी न मिळाल्याने परिपक्व झालेले केळांच्या घडा सह झाडं आपोआप उन्मळून खाली पडत आहे. हाती आलेलं केळीचे पीक नैसर्गिक आपत्ती मुळे नेस्तनाबूत होत असल्याने केळी उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे...
या परिसरातील शेतकरी दरवर्षी आर्थिक फायदा होईल म्हणून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पिकांची लागवड करतो परंतु अशी बिकट स्तिथी निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिकरित्या संकटात सापडतो,शासनाने यासाठी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा या भागातील केळी उत्पादकांनी केली आहे....
आता अतीतापमानामुळे झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार काय दिलासा देते या कडे आता या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.