अमरावती - शहरातील रामपूरी कॅम्प व सिद्धार्थनगर मधील तरुणांच्या दोन गटात राडा झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
एकीकडे कोरोनामुळे असलेल्या संपूर्ण शहरात संचारबंदी लागू असल्याने पोलीस यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढत असताच अमरावतीमध्ये तरुणांच्या गटात होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास अमरावती शेतातील रामपुरी कॅम्प व सिद्धार्थ नगर या दोन भागातील शेकडो तरुण एक एकमेकांसमोर उभे ठाकून जोरदार दगडफेक केली.
यामध्ये काही तरुण जखमी झाले असून प्रतिबंधक म्हणून सात तरुणांना गाडगे नगर पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान या दोन्ही भागांतील तरुणांच्या टोळक्यामध्ये शुल्लक कारणांमुळे वाद झाला आणि वादाचे रूपांतर दगडफेक व मारहाणीमध्ये झाले.
यावेळी दोन्ही गटातील शेकडो तरुण हे रस्त्यावर येऊन एकमेकांवर भिडले होते. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून तेथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात कारण्यात आला आहे.