ETV Bharat / state

हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा - अमरावती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात पार पडला.

हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा
author img

By

Published : Apr 30, 2019, 11:44 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील यावली शहीद गावात आज मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या अभूतपूर्व सोहळ्याला ग्रामस्थांसह हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.

भक्त प्रतिक्रिया व्यक्त करताना

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमापूर्वी गावातील गल्लीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर प्रकाश देणाऱ्या पणत्यांनी संपूर्ण यावली गाव न्हाऊन निघाले होते. तसेच गावातील प्रत्येक उंबरठ्यासमोर काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहलेली भजनांचे गायन करण्यात येत असल्याने ग्रामस्थ व गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध झाले होते. जन्मोत्सवानंतर सामुदायिक ध्यान व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पालखीच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. या सोहळ्याला महाराष्ट्रातून हजारो भक्तांनी हजेरी लावली होती.

Intro:हजारों गुरुदेव भक्तांच्या साक्षीने झाला अमरावतीच्या यावलीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा

अमरावती अँकर

सुमधुर संगीत अन लखलख पणत्यांचा त्यांचा मंद प्रकाश, घरासमोर काढलेली रांगोळी ,पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट ,शंखाच्या निनादात संपूर्ण गाव पणत्यांच्या प्रकाशात नाहून निघाले त्याच लखलखत्या पणत्यांच्या साक्षीने अन् हजारो गुरुदेव भक्तांच्या साक्षीने भल्या पहाटे पाळणा हलला अन् संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अमरावतीच्या यावली शहीद गावात पहाटे साडे पाच वाजता आनंदात पार पडला. निमित्त होते ते राष्ट्रसंतांच्या ग्राम जयंती महोत्सवाचे संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या या विषयी देते आज सकाळी उत्साहात पार पडला ग्रामस्थांसह हजारो भक्तांच्या या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थिती लावली होती .

आज मंगळवारी प्राप्त काळी साडेचार वाजता पासून जन्मावतरण पुष्पांजली सोहळ्याला सुरुवात झाली आणि ठीक पाच वाजून 30 मिनिटांनी अंगावर शहारे आणणारे संगीत व काळोख अंधारातील लखलखत्या पणत्या व हजारो गुरुदेव भक्तांच्या साक्षीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पाळणा हलला व महाराजांचा जन्म उत्सव पार पडला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव हा जयंती म्हणून साजरा होऊ नये त्याची ग्रामजयंती व्हावी समाजामध्ये चांगले काम व्हावे माझा जन्म गावाच्या चांगल्या कामासाठी लागावा म्हणून गावा गावाची जागवा भेदभाव समुद्र मिटवा या उद्देशाने राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या अमरावतीच्या यावली शहीद गावात ग्रामजयंती व जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला प्राप्त काळी साडेचार वाजता या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली कार्यक्रमापूर्वी भल्या पहाटे गावातील गल्ली गल्ली साफ व स्वच्छ करण्यात आली गल्लीबोळातील अंधार नाहीसा होऊन जणू या गावात दिवाळीच असल्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत होता . प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर प्रकाश देणाऱ्या पणत्यांनी त्याच प्रकाशात संपूर्ण यावली गाव न्हाऊन निघाले होते. गावातील प्रत्येक उंबरठ्या समोर काढलेली रांगोळी ही लक्ष वेधून घेत होती .संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहलेली भजनांनी ग्रामस्थ व गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध केले. पहाटे साडेपाच वाजता फुलांच्या वर्षावात पाळण्यात झुलणारे राष्ट्रसंत पाहून उपस्थित प्रत्येक गुरुदेव भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. जन्मोत्सवा नंतर सामुदायिक ध्यान व आरती झाली त्यानंतर पालख्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी पालख्यांच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा असे म्हटले जाते परंतु राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव म्हणजे यावली करांसाठी जणू दिवाळीची पर्वणी असल्याचं येथे पाहायला मिळत होते. गावातील गल्लीबोळातून जाणाऱ्या प्रत्येक पालखीचे आदर तिथ्यानी यावली वासियांनी स्वागत केले गेले यावली करांचा आदरतिथ्य पाहून पालखी पदयात्रेकरूही भारावून गेले होते .राष्ट्रसंतांच्या जन्मोत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातून हजारो भक्तांनी यावली शहीद गावात हजेरी लावली होती.

बाईट-रामप्रियाजी किर्तनकारBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.