अमरावती : तिवसा ते कुऱ्हा मार्गावर ( Tivasa to Kurha Marg ) काल सायंकाळच्या सुमारास वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला ( Two died in accident ) असून, १४ जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. (road accident in amravati)
ट्रकने दिली रीक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक : प्राप्त माहितीनुसार, तिवस्यावरून वाठोडा मार्गे कुऱ्हा जाणाऱ्या भरधाव ट्रकने कुऱ्हावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या रीक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकाचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये एकूण 14 जण जखमी असून 7 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले : अपघातातील जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात, नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींमध्ये उमेश शिंदे राहणार मोझरी, शितल माटे राहणार जळका, रेखा वाघमारे, शे.बाजार, सीमा तेलंग, रोनक विशाल तेलंग, हिंगणघाट, श्रीकृष्ण वाघमारे, शे.बाजार, आरोही तेलंग, श्वेता शेंद्रे, विराट शेंद्रे, दीप्ती शेंद्रे, प्रांजली हेमंत गोरखेडे, ऋतुश्री गौरखेडे, सानवी गौरखेडे सर्व रा तिवसा अशी जखमींची नावे आहेत. तर सोमा तापा कोरटकर वय 45, राहणार घोटा व कैलास वाघमारे वय 50 राहणार शे.बाजार अशी मृतांची नावे आहेत.