अमरावती मासेमारी करायला गेलेल्या आदिवासीला गरम सळाखीचे चटके दिल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा आदिवासींना झाडाला बांधून मारण्याचा प्रयत्न केल्याची पुन्हा एक घटना मेळघाटच्या वनक्षेत्रात घडली. शेतीचे कामे आटपून जंगलातून घरी जाताना खेकडे पकडण्यास गेलेल्या आदिवासींना वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मेळघाटच्या हतरु, माडीझडप जंगलात घडली. दादू बेठेकरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील हतरू (रायपूर) येथील युवक दादू बेठेकर, बाबूलाल भुमया धांडे, मुंग्या बाजीलाल ठाकरे,भाऊलाल मोतीलाल ठाकरे, हतरू हे माडीझडप शेतशिवारात नदीकाठी खेकडे व मासोळी पकडण्या साठी नाल्यावर गेले होते. दरम्यान रायपूर येथील वनरक्षक वरुडकर व त्यांचे सहकारी शेलार यांनी आम्हाला शिवीगाळ केली तसेच अंगावरील कपडे काढून झाडाला बांधून मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार दादू बेठेकर यांनी चिखलदरा पोलीस स्टेशन दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी घटनेचे वन विभागाच्या कर्मचाऱ्या विरोधात चौकशी करून वन विभाग चे अधिकारी, कर्मचारी रायपूर येथील कार्यरत वरूडकर व शेलार यांच्या विरोधात कलम ३२३/५०४/५०६ प्रमाणे गुन्हे दाखल केला आहे.