अमरावती- शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बैल वर्षभर राबत असतो. त्यामुळे, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सन शेतकरी साजरा करत असतात. आदिवासी शेतकाऱ्यांनी देखील बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक नृत्य सादर करून बैलांप्रति आदर व्यक्त केला आहे.
गावातील सर्व आदिवासी शेतकरी एका झाडाखाली येऊन तेथे पैसा गोळा करतात व स्वत: मोहाची दारू काढतात. त्यानंतर दारू पिऊन बेधुंद अवस्थेत आदिवासी शेतकरी नृत्य करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मेळघाटात कायम आहे. या वर्षी देशात कोरोनाचे संकट असल्याने पोळा सन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, आदिवासी शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनसोक्तपणे पोळा सन साजरा केला व पारंपारिक नृत्याची परंपरा जपली.
हेही वाचा- कोरोनामुळे 'गोटमार' बंदीचा निर्णय; आदेश धुडकावत पार पडली गोटमार