ETV Bharat / state

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैरात जंगल सफारीत पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाले. या वाघाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

author img

By

Published : Nov 18, 2020, 1:51 PM IST

tourists spot tiger in melghat tiger reserve
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैरात जंगल सफारीत काही पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दिवाळीनंतर मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अनेक पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. तीन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारगड बोरी जंगलात एकाचवेळी चार वाघ पर्यटकांना बघायला मिळाले होते. एकाचवेळी चार वाघ दिसल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन...
सध्या दिवाळीनंतर आता मेळघाटमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यात अनेक प्राणीप्रेमी पर्यटक हे वैराट जंगल सफारीला प्राधान्य देतात. अशातच काल काही पर्यटक हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी करत असताना त्यांच्या नजरेस एक वाघ दिसला. यावेळी त्या पर्यटकांनी वाघाचा रुबाब आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
शेकडो प्रजातीचे प्राणी -
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे प्राणी आहेत. परंतु नेहमी या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीव मुक्त संचार करत आहेत.
महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्प
भारतात एकूण ९ अभयारण्यांना २२ फेब्रुवारी १९७४ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. मेळघाटमध्ये ६ मे व ७ मे रोजी प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ३५ वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, तर ७५२ गवे आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.