ETV Bharat / state

Chikhaldara Tourism : थंडीचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटक पुन्हा चिखलदऱ्यात दाखल - विदर्भाचा काश्मीर चिखलदरा

मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन होते. परंतु आता लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता मिळाली असल्याने पर्यटकांचा कल चिखलदाराकडे वाढला आहे. त्यामुळे दरोरोज हजारो पर्यटक हे पर्यटनाला येत आहे. चिखलदरामधील देवी पॉइट, ( Devi Poit in Chikhaldara ) सन सेट पॉइटसह आदि ठिकाणी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहे.

पर्यटक पुन्हा चिखलदऱ्यात दाखल
पर्यटक पुन्हा चिखलदऱ्यात दाखल
author img

By

Published : Dec 9, 2021, 8:18 PM IST

Updated : Dec 9, 2021, 8:33 PM IST

अमरावती - विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरामध्ये ( Chikhaldara Tourist Spot ) आता मागील आठवड्यापासून कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. विदर्भातील सर्वात थंड हवेच्या ठिकाण ( Coldest Place in Vidarbha ) असलेल्या चिखलदरात आता विदर्भासह राज्यभरातील हजारो पर्यटक दररोज पर्यटनासाठी दाखल होत आहे. दिवसभर पडणारी गुलाबी थंडी त्यामुळे पर्यटक या थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन होते. परंतु आता लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता मिळाली असल्याने पर्यटकांचा कल चिखलदाराकडे वाढला आहे. त्यामुळे दरोरोज हजारो पर्यटक हे पर्यटनाला येत आहे. चिखलदरामधील देवी पॉइट, ( Devi Poit in Chikhaldara ) सन सेट पॉइटसह आदि ठिकाणी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहे.

आढावा घेतांना प्रतिनिधी
  • विविध ठिकाण पुन्हा झाले सुरु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून चिखलदरामधील गाविलगड किल्ला हा बंद होता. परंतु आता दिवाळीनंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी व पर्यटक मोठ्या प्रमाणावर या किल्ल्याला भेट देत असून येथील इतिहासाची माहितीही पर्यटक घेत आहे. निसर्गात असलेली अद्भुत किमया येथे येऊन अनुभवतो, असे पर्यटक सांगतात. चिखलदरात विविध पाहण्याजोगे स्थळ आहेत. मात्र, येथील प्रसिद्ध देवी पॉईंट तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉईंटला अधिक दिसून येते. तर, देवी पॉईंट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटरवर असलेला चिखलदरा पर्यटकांना भूरळ पाडत आहे. सोबतच जवळच असलेले सेमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकास येथे जाऊन पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात.

  • चिखलदरामध्ये तयार होतोय स्काय वॉक

चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प प्रस्तावीत करण्यात आला आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगन भरारी पूल आहे. हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्काय वॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. जगात स्वित्झर्लंड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चीनचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा असला तरी जगातील सर्वांत मोठा स्कायवॉक आहे.

हेही वाचा - राज्यात शाळा सुरू, मात्र 'या' प्राण्याच्या दहशतीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन शाळा बंद

Last Updated : Dec 9, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.