अमरावती - दिवसेंदिवस अमरावतीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज (गुरुवार) नवीन आणखी 4 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 190 वर पोहोचली आहे. आज शहरातील दसरा मैदान परिसरालगतच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका युवकाला कोरोना झाल्याचा अहवाल सकाळी साडेनऊ वाजता प्राप्त झाला. या कोरोनाग्रस्त युवकाला उपचारासाठी कोविड रुग्णालयात नेण्यासाठी मात्र, तब्बल 3 तास वाट पाहावी लागली.
अमरावतीत बुधवारी कोरोनाचा केवळ एकच रुग्ण आढळून आला होता. आज (गुरुवार) मात्र मसानगंज परिसरातील 50 वर्षाच्या पुरुषांसह 35 वर्षाची महिला तसेच हनुमान नगर परिसरतील 35 वर्षीय महिला आणि दसरा मैदान झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षाच्या युवकाला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे अमरावतीत आता कोरोनाग्रस्तांची सांख्य 190 वर पोहोचली आहे.
दसरा मैदान परिसरातील युवकाला कोरोना असल्याची माहिती सकाळी साडेनऊ वाजता मिळाली होती. तरीही पालिकेच पथक दुपारी 12 वाजता त्याच्या घरी पोहोचले. महापालिकेचे पथक पोहोचेपर्यंत हा युवक परिसरात फिरत असल्याची माहिती आहे. महापालिकेचे पथक 12 वाजत पोहोचल्यावर रुग्णवाहिका साडेबारा वाजता दसरा मैदान परिसरात आली. यानंतर कोरोनाग्रस्त युवकाला उपचारासाठी कोविड रुग्णालयात हलवण्यात आले.