अमरावती - चांदणी चौक परिसरात राजा ट्रेडर्स या दुकानावर अन्न व औषध प्रशासन पथकाने छापा टाकून पावणेचार लाख किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.
संबंधित कारवाई दरम्यान मोहसीन खान मोबीन खान (वय 36) याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानक कायदा तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अन्नापुरे व साहाय्यक आयुक्त केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा परतूर पोलिसांनी 15 लाख 60 हजारांचा पकडला गुटखा
भाऊराव चव्हाण, राजेश यादव आणि सीमा सूरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, यामध्ये दुकानातून विविध ब्रँड्स चा गुटखा, पानमसाला तसेच सुगंधी तंबाखू,इ प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. या साठ्याची एकूण किंमत 3 लाख 77 हजार 380 रुपये आहे.