ETV Bharat / state

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन

जंगल सफारी करत असताना त्यांच्या जिप्सीसमोर एका वाघाने पर्यटकांना दर्शन दिले आहे. यावेळी या वाघाच्या हालचाली पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन
author img

By

Published : Dec 31, 2020, 6:40 PM IST

अमरावती - मेळघाटमधील व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान काही पर्यटकांना पट्टेदार वाघाने दर्शन दिले आहे. सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी मेळघाटात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी आहे. अशातच काही पर्यटक हे आज जंगल सफारी करत असताना त्यांच्या जिप्सीसमोर एका वाघाने पर्यटकांना दर्शन दिले आहे. यावेळी या वाघाच्या हालचाली पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन

शेकडो प्रजातीचे प्राणी -

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे प्राणी आहेत. परंतु नेहमी या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीव मुक्त संचार करत आहेत.

महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्प -

भारतात एकूण ९ अभयारण्यांना २२ फेब्रुवारी १९७४ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. मेळघाटमध्ये ६ मे व ७ मे रोजी प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ३५ वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, तर ७५२ गवे आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.