अमरावती - जिल्ह्यातील पथ्रोड सिंदी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. पारडी परिसरातील सुनील सदाफळे यांच्या गाईच्या वासराची नुकतीच शिकार केली. गेल्या १५ दिवसात ही तिसरी शिकार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे वाचलं का? - अमरावतीमध्ये वाघाची दहशत, काळविटाला केले फस्त
काही दिवसांपूर्वी याच परिसरात रान डुकराची शिकार केली होती. तेव्हापासून वनविभाग वाघाच्या शोधात आहे. मात्र, त्याच्या पायाच्या ठश्यावरून देखील वनविभागाला वाघाचा शोध लागला नाही. वनविभागाने पिंजरा लावून तसेच ड्रोनच्या माध्यमातून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वनविभागाला अपयशच मिळाले. त्यामुळे वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.