अमरावती - बंगालच्या उपसागरात "निवार" नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाउस पडणार असल्याचा अंदाज अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूतील मलापुरमजवळ भूभागावर तीव्र चक्रीवादळाच्या रूपात धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाचा वेग प्रति तास १२० किमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात आजपासून २७ तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा - पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..