ETV Bharat / state

दुबार पेरणीच्या संकटानंतर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे, दोन आठवड्यापासून अमरावती जिल्ह्याकडे पावसाची पाठ

author img

By

Published : Aug 13, 2021, 3:38 PM IST

शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहतो ती पावसाची. त्याने मोठ्या मनाने दान दिल तर जमिनीतील धान दग धरते. आणि जमिनीतील धानाने तग धरली तर शेतकरी वर्षभर चांगली तग धरतो. मात्र, यावर्षी काही भागात चांगली सुरूवात केली आणि अचानक हा मेघराजा गायब झालाय. त्याने अशी पाठ फिरवल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यामधून मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यावर पीकानेही चांगला बहर धरला. परंतु मागील दोन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे पिकं संकटात आली आहेत.

अमरावती जिल्ह्यात भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांवर पिके जगवण्यासाठी तुषार सिंचन लावण्याची वेळ आली आहे.

अमरावती - प्रत्येक वर्षी शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहतो ती पावसाची. त्याने मोठ्या मनाने दान दिल तर जमिनीतील धान दग धरते. आणि जमिनीतील धानाने तग धरली तर शेतकरी वर्षभर चांगली तग धरतो. मात्र, यावर्षी काही भागात चांगली सुरूवात केली आणि अचानक हा मेघराजा गायब झालाय. त्याने अशी पाठ फिरवल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यामधून मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यावर पीकानेही चांगला बहर धरला. परंतु मागील दोन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे पिकं संकटात आली आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने, दडी मारल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे पिके संकटात आली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे-

शेतकऱ्यांनी उसनवार पैसे आणून शेतात पुन्हा पिकाची लागवड

यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्याने, बऱ्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस, तुर सोयाबीन, आदी पिकांची लागवड केली होती. परंतु, त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी उसनवार पैसे आणून शेतात पुन्हा पिकाची लागवड केली. त्यानंतर पाऊस आला आणि पीक आता मोठी झालीत. मात्र, मागिल दोन आठवड्यांपासून पावसाचा मोठा खंड अमरावती जिल्ह्यामध्ये पडला आहे. त्यामुळे उभी झालेले पीकं आता पाण्यासाठी तहानलेली आहेत. त्यामुळे जर आता लवकर पाऊस आला नाही, तर अनेक भागातील शेतकऱ्यांचे पिके धोक्यात येऊन शेतकर्‍यांवर संकट उभे राहणार आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार यासाठी शेतकऱ्यांचे डोळे हे आता आभाळाकडे लागले आहे.

पावसाळ्यात तुषार सिंचन लावण्याची वेळ

जिल्ह्यातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरनात सद्या 59 टक्के जलसाठा आहे. जर पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस आला नाही. धरणात जलसाठा वाढला नाही, तर शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. आजची परिस्थिती अशी आहे की, पीक जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचन लावण्याची वेळ आली आहे. मागील दोन आठवड्यापासून पश्चिम विदर्भात पावसाने दडी मारल्याने आता पीक पाण्यासाठी तहानलेली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांवर पिके जगवण्यासाठी तुषार सिंचन लावण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी वीज आणि सिंचनाची व्यवस्था आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचन लावून पिके जगविण्याची धडपड सुरू केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचा एकही पर्याय नसल्याने त्यांनी शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण 7 लाख हेक्टर पेरणी योग्य जमीन

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर आता पुन्हा एकदा संकट कोसळले असून, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 7 लाख हेक्टर पेरणी योग्य जमीन आहे. त्यापैकी यंदा 97 टक्के जमिनीवर पेरणी झाली. एकूण पेरणी - 6.78 लाख हेक्टरवर पेरणी झाली तूर - 1 लाख 22 हेक्टरवर पेरली, सोयाबीन - 2 लाख 60 हेक्टरवर पेरली, कपाशी - 2 लाख 27 हेक्टरवर पेरली, 91 लाख हेक्टर वर इतर पीक आहे.

हेही वाचा -Twitter v/s Congress : टि्वटर खाते लॉक झाल्यावर राहुल गांधी म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.