ETV Bharat / state

अमरावती : थिलोरीतील पाणी पुरवठा चार दिवसापासून बंद, ग्रामस्थांचे हाल - ग्रामस्थ

जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गावकऱ्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकरचे पाणी घेण्यासाठई गावकऱ्यांनी केलेली गर्दी

author img

By

Published : Mar 1, 2020, 11:01 AM IST

अमरावती - जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गावात कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे लोकांचे मोठे हाल होत आहेत.

बोलताना ग्रामस्थ

यासंदर्भात वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊनही पाणीपुरवठा अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही. स्थानिक आमदार बळवंत वानखडे व गावकऱ्यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी मागवित आहेत. पाणी मिळावे यासाठी महिला टँकरवर मोठी गर्दी केली होती. तीन ते चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद असून जीवन प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष का करत आहे. पाण्यामुळे कोणाचे जीव गेल्यावर पाणी देणार का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे . गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाला ग्रामपंचायत सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.

हेही वाचा - कापसाच्या बाजाराला 'कोरोना'चा संसर्ग..! शेतकऱ्यांवर नवे संकट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.