अमरावती- अमरावती शहरात कोरोनामुळे एक व्यक्ती दगवल्याने संपूर्ण शहरात आज शुकशुकाट पसरला आहे. मृतकाच्या अंत्यसंस्काराला सहभागी व्यक्ती तसेच त्यांच्या नातेवाईकांची तपासणी करुन अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हेही वाचा- योगी सरकार बनवणार तीन पदरी खादी कापडाचे स्वदेशी मास्क, वापर सर्वांना अनिवार्य
गुरुवारी न्यूमोनियामुळे एक व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात दगावला होता. मृत्यूपुर्वी त्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते. स्वॅब तपासणीचा चाचणी अहवाल शनिवारी पहाटे आल्यावर तो व्यक्ती कोरोनामुळे दगावलयाचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात येण्यापुर्वी ज्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्या रुग्णालयात फवारणी करण्यात आली असून तेथील डॉक्टरांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मृतकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी लोकांसह त्याच्या नातेवाईकांची तापसणी करुन त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अमरावती शहरात सध्याघाडीला एकही कोरोना रुग्ण नाही. मात्र, कोरोनामुळे अचानक एक व्यक्ती दगवल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावतीकरांनी आजारासंदर्भात योग्य माहिती देण्याचे आवहान केले आहे.