अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा तत्काळ मिळावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात टेलिमेडिसीन हा प्रकल्प राबवला गेला. तेव्हा तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पदभार (Implemented telemedicine project to provide health services in Melghat) सांभाळताच टेलिमेडिसीनला प्राधान्य दिले होते. (Telemedicine project in Melghat ) मात्र, याच ड्रीम प्रोजेक्टला आता टाळे लागले आहे. टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास मदत होते. (Implemented telemedicine project to provide health services) मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात टेलिमेडिसीन सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच ती बंद पडली आहे.
टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद
टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, यासंदर्भात थेट मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोईस्कर होत होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तर, फड नव्हता त्यामुळे हे बंद पडला तसेच, संजीवनी पोर्टल व आता आरोग्य सेवा उपचार सुरु आहे व कुठल्याही प्रकारची गैर सोय रुग्णांची होणार नाही यांची काळजी घेत आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली.
कशी काम करते ही यंत्रणा
टेलिमेडिसीन सुविधेव्दारे ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ सल्ला देता येतो. व्हिडिओ कॉन्स्फरसिंग तज्ञ सल्ला उपलब्ध करुन दिला जातो. वैदयकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ व इत्यादीचे वैदयकीय ज्ञान अदावयत करण्यासाठी निरंतर वैदयकीय शिक्षण (सी.एम.ई) आयोजित करता येतात.
हेही वाचा - मतदारांच्या मतपेट्यांमधून नेत्यांना चिठ्ठ्या लिहून कानपिचक्या