ETV Bharat / state

शववाहिका न मिळाल्याने मृतदेह स्कूलबसने नेला स्मशानभूमीपर्यंत - Amravati Corona News Update

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका ही कमी पडत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार अमरावतीतून समोर आला आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने मृतदेह स्कूलबसने, स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला.

शववाहिका न मिळाल्याने मृतदेह स्कूलबसने नेला स्मशानभूमीपर्यंत

author img

By

Published : Apr 24, 2021, 8:23 PM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिकाही कमी पडत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार अमरावतीतून समोर आला आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने मृतदेह स्कूलबसने स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला.

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. मृतदेहांना स्मशानभूमिपर्यंत नेण्यासाठी शववाहिका देखील कमी पडू लागल्या आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे.

शववाहिका न मिळाल्याने मृतदेह स्कूलबसने नेला स्मशानभूमीपर्यंत

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली

अमरावतीत कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. परंतु, आता अमरावतीमध्ये इतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित उपचारासाठी येत असल्याने मृतदेहाचा आकडा देखील वाढला आहे. मृतांचा आकडा वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागत आहे, पूर्वी कोरोना रुग्णांवर केवळ विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत होते, मात्र आता मृतांची संख्या वाढत असल्याने विद्युत दाहिनीसोबतच लाकडांच्या सहाय्याने देखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. विद्युत दाहिनी सकाळी 7 पासून रात्री 2 पर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा - अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा; सीबीआयने नेमके काय सील केले?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.