ETV Bharat / state

यंदाच्या उन्हाळ्यात पश्चिम विदर्भात सूर्य आग ओकणार; पारा ४७ अंशावर जाणार

आता बंगालचा उपसागरावर हा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि उत्तरेकडे कडून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे पुढील दोन तीन दिवस तापमानात काही प्रमाणात घट होईल. त्यामुळे दुपारचे तापमान 34-35 डिग्री सेल्सिअस राहील. तर सकाळचे तापमान ही 15 डिग्रीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर दहा मार्च नंतर तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल.

विदर्भात सूर्य आग ओकणार
विदर्भात सूर्य आग ओकणार
author img

By

Published : Mar 4, 2021, 10:13 AM IST

Updated : Mar 4, 2021, 4:51 PM IST

अमरावती - सध्या मार्च महिना सुरू झाला असून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. त्यातच गतवर्षी लाबंलेला पावसाने यंदाचा हिवाळा अधिककाळ जाणवला नाही. मात्र आता विदर्भाचा पारा वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात पश्चिम विदर्भातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यंदा पारा ४७ अंशावर जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉक्टर अनिल बंड यांनी वर्तवला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात पश्चिम विदर्भात सूर्य आग ओकणार
काय आहे यावर्षी उन्हाळ्याचा अंदाज..?

गेल्या चार पाच दिवसापासून बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे विदर्भात येत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच तापमानात वाढ होऊ, लागली आहे. दुपारचे तापमान 34-36 अंशापर्यंत गेले होते. तसेच सकाळचे तापमान 16-17 डिग्री पर्यंत वाढले होते. परंतु आता बंगालचा उपसागरावर हा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि उत्तरेकडे कडून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे पुढील दोन तीन दिवस तापमानात काही प्रमाणात घट होईल. त्यामुळे दुपारचे तापमान 34-35 डिग्री सेल्सिअस राहील. तर सकाळचे तापमान ही 15 डिग्रीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर दहा मार्च नंतर तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल.

15 एप्रिल दरम्यान तापमान वाढणार-

मार्च महिन्यातील 20 तारखेपासून दुपारचे तापमान 38 डिग्रीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच मार्चच्या शेवटी तापमान 38 पासून 40 पर्यंत वाढण्याची शक्यता असून 15 एप्रिलनंतर तापमान 45 डिग्रीच्यावर जाण्याची शक्यता आहे. आता सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असल्यामुळे उन्हाचा पारा वाढू लागला आहे. परंतु मधून-मधाून उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे त्याचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो.

मागील वर्षी ही होती परिस्थिती-

मागील वर्षी हिमालयावर वेस्टर्न डिस्टर्ब येत असल्यामुळे आपल्याकडे बर्‍याच वेळ पाऊस आला आणि ढगाळ वातावरण सुद्धा होते. त्यात लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरात होते. त्यामुळे लोकांना मागील वर्षी उन्हाचा फार त्रास जाणवला नाही. परंतु यंदा वेस्टन डिस्टर्बची तिव्रता तुलनात्मक कमी असल्यामुळे या वर्षी उन्हाळा हा जास्त जाणवेल, असा अंदाज आहे. तसेच उन्हाळ्यात 44 डिग्रीच्या वरचे तापमान बरेच दिवस राहील, असा अंदाजही बंड यांनी व्यक्त वर्तवला आहे.

मे मध्ये ढगाळ वातावरणची शक्यता-
मागील वर्षी अमरावती मधील तापमान 46 डिग्रीपर्यंत वाढलेले होते आणि यावर्षीही ही पातळी कायम राहण्याची शक्यता आहे. 15 मार्च नंतर तापमान वाढायला लागेल जास्तीत जास्त उन्हाची तीव्रता एप्रिलच्या शेवटी शेवटी गाठली जाईल आणि मे महिन्यात पुन्हा काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने तापमान कमी होईल, असा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

Last Updated : Mar 4, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.