अमरावती - मागील तीन आठवड्यांपूर्वी परतीचा पाऊस गेल्यानंतर लगेचच राज्यात थंडीचा जोर वाढला होता. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. परंतु आता पारा ११ अंशापेक्षा खाली आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील तूर पिकावर अळीचे सावट आले आहे. येत्या काळातही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अमरावतीत पारा ११ अंशापेक्षा खाली यावर्षी राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील जलस्रोत सुद्धा तुडुंब भरले आहे. यावर्षी परतीचा पाऊस थांबल्यावर राज्यात थंडीचा जोर वाढला होता. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण व पावसामुळे थंडी कमी झाली होती. परंतु आता पुन्हा पारा ११ अंशापेक्षा खाली आल्याने थंडी वाढली आहे.जिल्ह्यात पावसाचा अंदाज
तामिळनाडूमध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३० नोव्हेंबरपर्यंत विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिकांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.हेही वाचा - कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचा इतिहास