ETV Bharat / state

विशेष बातमी : कोरोनाच्या काळातही टाकाऊपासून टिकावू शैक्षणिक साहित्य करणारे गुरुजी - gokulsara school news

विनोद भोयर यांनी ही कला एका विषयापूर्ती मर्यादित ठेवली नाही तर त्यांनी इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, इतिहास सामाजिक विषय, पर्यावरण यासारख्या विषयांनाही कलेच्या माध्यमातून हात घातला आहे. सोबतच वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस हे वर्गांतील सर्व मुलांना माहीत व्हावे यासाठी त्यांनी एक अनोखा बोर्ड तयार केला आहे. यासोबतच त्यांनी टाकाऊ वस्तूपासून कॅलेंडरसुद्धा बनवले आहे.

teacher making stuff by using waste in amravati
विशेष बातमी : कोरोना काळातही टाकाऊपासून टिकावू शैक्षणिक साहित्य करणारे गुरजी
author img

By

Published : Jun 2, 2021, 5:26 PM IST

अमरावती - सध्या कोरोनाच्या काळात असून लॉकडाऊन असल्यामुळे शाळा महाविद्यालयेसुद्धा बंद आहे. त्यामुळे काही शिक्षक ऑनलाइन वर्ग घेत आहे. तर काही शिक्षक हे घरीच आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थ्यांप्रती शिक्षणाची तळमळ एका शिक्षकाने कोरोना काळात जिवंत ठेवली आहे. विनोद भोयर असे या शिक्षकांचे नाव असून ते चांदूररेल्वे येथील रहिवासी आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण म्हणून काम करत मागील तबल २० वर्षांपासून ते टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शैक्षणिक वस्तू बनवत आहेत. या वस्तू विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी महत्त्वाच्या ठरत आहे. विनोद भोयर यांनी आतापर्यंत तब्बल दोनशेपेक्षा जास्त शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी बनवले आहे. या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणाची पद्धतीसोपी केली आहे.

विशेष बातमी : कोरोना काळातही टाकाऊपासून टिकावू शैक्षणिक साहित्य करणारे गुरजी

शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिक्षण

हल्ली शिक्षण म्हटले, की विद्यार्थ्यांच्या हातात लेखन तर शिक्षकाच्या हातात फळ्यावर चालणारा खडू, पेन, पेन्सिल या वस्तू अभ्यासाचे धडे गिरवण्यासाठी वापरल्या जात असल्याचे आपण पाहतो. पण याव्यतिरिक्त आणखी अनेक असे साहित्य आहे, की ज्यामुळे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकवलेले पटवून देता येईल. विनोद भोयर यांचा हा प्रयत्न असून ते मागील २० वर्षांपासून अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या या साहित्याने विनोद भोयर यांची शाळा फुलून गेली आहे. शाळेच्या भिंत्तीवर लावलेले हे साहित्य चर्चेचा आणि तेवढाच कुतूहलाचा विषय ठरत आहे.

सर्वच विषयांचे बनवले साहीत्य

विनोद भोयर यांनी आपली कला ही एका विषयापूर्ती मर्यादित ठेवली नाही तर त्यांनी इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, इतिहास सामाजिक विषय, पर्यावरण यासारख्या विषयांनाही कलेच्या माध्यमातून हात घातला आहे. सोबतच वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस हे वर्गांतील सर्व मुलांना माहीत व्हावे यासाठी त्यांनी एक अनोखा बोर्ड तयार केला आहे. यासोबतच त्यांनी टाकाऊ वस्तूपासून कॅलेंडरसुद्धा बनवले आहे.

'या' वापरल्या टाकाऊ वस्तू
विनोद भोयर हे नेहमी टाकावू वस्तुपासूनच शैक्षणिक वस्तू तयार करतात. यामध्ये त्यांनी फटाक्यांच्या रिकाम्या नळ्या, फर्निचर, केसिंग, नळ फिटिंगचे वाया गेलेले पाइप, खेळायच्या पत्त्याचे बॉक्स, वेल्डिंगच्या रिंग, सायकल स्पोक, निकामी डब्याचे झाकण, चुंबकाचे तुकडे, डीसी मोटर्स, खर्डे, लाकडी ठोकळे इत्यादी त्यांनी तयार केल्या आहेत.

'धागा फिरवा, उत्तर मिळवा' साहित्याला राज्यस्तरावर सन्मान

विनोद भोयर यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्यमधील एक साहित्य म्हणजे धागा फिरवा आणि उत्तर मिळवा. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गणित अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे या साहित्याला राज्यस्तरावर सन्मानित देखील केले आहे. शेतीचे महाग साहित्य विकत आणण्यापेक्षा जुगाड तंत्रज्ञानातून काही शेतीसाहित्य निर्मिती विनोद भोयर यांनी कोरोना काळात केली आहे. बाजारात बाराशे रुपय मूल्य असलेले तण कापण्याचे यंत्र भोयर यांनी केवळ 300 रुपये तयार केले आहे.

स्वतःहा सांकेतिक भाषा केली तयार
विनोद भोयर यांनी वस्तू तयार करण्याबरोबरच स्वतःची सांकेतिक भाषादेखील तयार केली आहे. हातवारे व चेहऱ्यावरील हावभाव करून त्यांचे विद्यार्थी वर्गात येणाऱ्या व्यक्तीचे सहज नाव ओळखतात.

पत्नीचाही मिळतो आधार, मुलगीही बनवते सुंदर साहित्य

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून घरबसल्या अनेक साहित्याची निर्मिती भोयर यांनी केली आहे. हे काम घरी करत असल्याने त्यांच्या पत्नीचीही त्यांना मोठी मदत मिळते. सोबतच मुलगी सुहानीनेसुद्धा कार्यानुभवावर आधारित अनेक सुंदर साहित्याची निर्मिती केली आहे. शालेय विद्यार्थ्यांमुळे आपले घर चालत असल्यामुळे याची जाणीव ठेवून आपल्या वेतनातील किमान दोन टक्के रक्कम नियमितपणे ते या साहित्यावर खर्च करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.